Mizuki Itagaki: जपानमधील प्रसिद्ध अभिनेता मिजुकी इतागाकी याचा मृतदेह तब्बल तीन महिन्यांनंतर आढळून आला असून, या बातमीने जपानी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडवली आहे. इतागाकी ३ महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी व चाहत्यांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता. अखेर पोलिसांनी त्याचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी सापडल्याचं जाहीर केलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह सापडलेलं ठिकाण आणि परिस्थिती पाहता आत्महत्येची शक्यता वर्तवली आहे, मात्र पोलीसांकडून अधिकृतरीत्या याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. इतागाकीच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
हा केवळ २४ वर्षांचा असून, त्याने अनेक लोकप्रिय जपानी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्याच्या अभिनयशैलीसाठी तो तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होता. सोशल मीडियावर त्याचे फॅन फॉलोइंगही मोठ्या प्रमाणात होतं. इतक्या तरुण वयात त्याचे अचानक असे जाणे हे संपूर्ण इंडस्ट्रीसाठी धक्कादायक ठरले आहे.
त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत अनेक सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर #RIPMizuki हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. च्या आठवणींना उजाळा देताना त्याचे चाहते त्याचे जुने फोटो, व्हिडीओ आणि खास क्षण शेअर करत आहेत. पोलिस अधिक तपास करत असून लवकरच या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.