Athiya Shetty and KL Rahul Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल यांनी त्यांच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिचा नाव जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव ‘इवारा' (Evaarah) असं ठेवलं असून, या नावाचा अर्थ देवाची देणगी असा आहे. सोशल मीडियावर त्यांनी ही गोड बातमी शेअर करताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
अथिया आणि राहुलने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्टद्वारे मुलीच्या नावाची घोषणा केली. त्यांनी लिहिलं, ‘इवारा - देवाने आम्हाला दिलेली भेट' या साध्या पण भावनिक कॅप्शनमधून त्यांनी आपल्या आनंद व्यक्त केला. त्यांच्या या पोस्टला काही तासांत लाखो लाईक्स मिळाले असून, अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'' हे नाव खास असून त्यामागे अध्यात्मिक आणि प्रेमळ अर्थ दडलेला आहे. अथिया आणि राहुल या दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलणं टाळलं आहे, पण त्यांनी ही गोड बातमी स्वतः शेअर करून आपल्या चाहत्यांना या आनंदात सामील केलं आहे.
आणि के.एल. राहुल यांनी 2023 मध्ये लग्न केले आणि त्यांच्या जोडीला ‘परफेक्ट कपल’ म्हणून ओळखलं जातं. आता त्यांच्या आयुष्यात ‘इवारा’च्या आगमनाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील ही जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, चाहत्यांना त्यांच्या लेकीचे पहिलं फोटो पाहण्याची उत्सुकता आहे.