चास, ता. १८ : वाडा ( ता. खेड) येथील अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात सांगता झाली. या सोहळ्यासाठी दिग्गजांनी उपस्थिती लावत उत्सवाची शोभा वाढवली, एकनाथ महाराज सदगिर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमात रंगत आणली.
वाडा येथे आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे सत्तावन्नावे वर्ष असल्याने भव्य स्वरूपात हा सोहळा झाला. जागृत असलेल्या श्री राम मंदिरात हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. यामध्ये काकड आरती, नेमाचे भजन हरिपाठ, हरिकीर्तन पार पडले. या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांची सेवा पार पडली. सप्ताहात अशोक महाराज पवार, ज्ञानेश्वर महाराज रासकर, सागर महाराज शिर्के, संतोष महाराज बढेकर, सचिन महाराज चकवे, अशोक महाराज शिंदे, बाळशिराम महाराज मिंडे यांची कीर्तनरूपी सेवा पार पडली. तर काल्याचे कीर्तन एकनाथ महाराज सदगिर यांचे झाले. शनिवारी (ता. १२) हनुमान जयंतीनिमित्त ज्ञानेश्वर महाराज पावडे यांचे हनुमान जन्माचे कीर्तन पार पडले. गुरुवारी (ता. १७) दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या सर्व सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, जिल्हा दूधसंघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे, उद्योजक संदीप घनवट, सागर महाराज शिर्के, सरपंच रूपाली मोरे, उपसरपंच रोहिदास शेटे, काळूराम सुपे, शिवाजी मोरे, शिवराम पावडे, माजी सरपंच रघुनाथ लांडगे, तुकाराम सुपे, शंकर हुंडारे, पांडुरंग हुंडारे, पोलिस पाटील दीपक पावडे, अक्षय केदारी, मिलिंद पोटभरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र मस्के उपस्थित होते. सात दिवस वीण्याची सेवा शांताराम महाराज मोरे यांनी केली. मृदंगाची साथ पवन महाराज गणगे, प्रकाश महाराज पावडे यांनी तर हार्मोनिअमवर ज्ञानेश्वर सुरकुले, नामदेव पावडे, गजानन पावडे, विठ्ठल सोळसे, शांताराम मोरे यांनी साथ दिली. चोपदार म्हणून गोविंद सोळसे, शंकर कदम उभे होते. सात दिवस हरिपाठ भीमाशंकर वारकरी शिक्षण संस्था कान्हेवाडी येथील विद्यार्थ्यांनी केली. या सोहळ्याचे नियोजन ग्रामस्थ वाडा, पुणेकर, नाशिकफाटा, सर्व तरुण मंडळे आणि महिला बचत गटांनी केले. सूत्रसंचालन गोरक्ष हुंडारे यांनी तर आभार जिल्हा दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांनी मानले.