साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही ओळ ज्यांना तंतोतंत लागू होते, त्या म्हणजे इन्फोसिसच्या प्रमुख, समाजसेविका, राज्यसभा खासदार आणि अनेक महान विचार ज्यांच्या लेखणीतून उतरले अशा सुधा मूर्ती. भारतीय अभिंयात्रिकी शिक्षिका आणि कन्नड, इंग्रजी भाषेतील देशातील प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. साधेपणा, नम्रपणा जपणाऱ्या सुधा मूर्ती प्रेरणादायी व्याख्याता म्हणून प्रसिद्ध आहेत.
सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी झाला आहे. कर्नाटकातील शिगगाव येथील सर्जन डॉ. आर एच कुलकर्णी आणि त्यांची पत्नी विमला कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत. घरातील साधेपणा आणि चांगले विचारांचे बीज लहान असतानाच कोवळ्या मनात त्यांच्या रूजले गेले.
सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकातील असला तरी त्यांचे बालपण महाराष्ट्रातील कुरूंदवाड येथे गेलं आहे. मराठी माध्यमिक शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं आहे. त्यांचे मराठीसह कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. सुधा मूर्तीं यांनी लहान असतानाच इंजिनीअरिंग होण्याचं स्वप्न मनाशी पक्क केलं होते. सुरूवातील घरातून या निर्णयाला विरोध झाला खरा…पण, त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. कारण त्याकाळी इंजिनीअरींगला प्रवेश घेणाऱ्या 150 मुलांमध्ये त्या एकट्याच होत्या. तिथेही त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण, त्या मागे हटल्या नाहीत.
सुधा मूर्ती यांनी बी.व्ही.बी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नॉलॉजीमधून बी. ई. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले आहे. येथे प्रथम क्रमांक पटकावल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडून त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी 1974 मध्ये इंडियन इन्सिट्यूट ऑफ सायन्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये एमई पूर्ण केले.
सुधा मूर्ती या भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी (TELCO) टाटा इंजिनीअरिंग अॅंड लोकोमोटिव्ह कंपनीमध्ये नियुक्त केलेल्या त्या पहिल्या महिला इंजिनीअर आहेत. त्यांना पुण्यात TELCO कंपनीत Development Engineer म्हणून जॉब मिळाला. त्यानंतर त्यांनी मुंबई आणि जमशेदपूर येथे काही काळ काम केलं. त्यांनी पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये वरिष्ठ सिस्टम्स ऍनालिस्ट म्हणूनही काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आणि मिळालेल्या अनुभवातून 1996 मध्ये इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली.
TELCO कंपनीमध्ये काम करताना त्यांची ओळख एन.आर.नारायण मूर्ती यांच्याशी झाली. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले. या दाम्पत्याला एक मुलगी अक्षता आणि मुलगा रोहन मूर्ती आहे. अक्षता यांचे पती माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आहेत.
सुधा मूर्ती यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. यात बालकांसाठी, लघुकथा, टेक्नॉलॉजी, प्रवासवर्णने, कांदबऱ्या यांचा समावेश आहे.
उत्तम लेखिकेसह सुधा मूर्ती या समाजसेविका देखील आहेत. मूर्ति इन्फोसिस फाउंडेशन या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी काम करतात. त्यांनी आतापर्यत पूरग्रस्त भागात 2,300 घरे बांधली आहेत. प्रत्येक शाळेत एक ग्रंथालय असावे असे त्यांचे स्वप्न असून त्यांनी आतापर्यत 70,000 ग्रंथालये उभारली आहेत. तर 16,000 सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. त्यांच्या या अभुतपूर्व कार्यासाठी 2006 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार, 2006 पद्मभुषण पुरस्कार यासंह अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
हेही पाहा –