आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. लोक स्वतःला किंवा कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. त्यांचे आयुष्य फक्त कामापुरते मर्यादित झाले आहे. अशा परिस्थितीत ताण येणे स्वाभाविक आहे. असं म्हणतात की जर तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल. यासाठी तुम्ही तुमचे आवडते काम करू शकता. तुमचे छंद जोपासू शकता. किंवा वर्षातून एक दोनदा तरी नक्कीच सहलीला जाऊ शकता. यामुळे तुमचे मन ताजेतवाने राहिल. आपली मानसिक स्थिती सुधारण्यासाठी या गोष्टी करणे जसे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपल्या आहाराकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.
काही पदार्थ असे आहेत जे मूड सुधारण्यासाठी काम करू शकतात. असे अनेक अन्नपदार्थ सापडतील जे ताण कमी करण्यास मदत करतात. तुमच्या आहारात हे पदार्थ तुम्ही नक्कीच समाविष्ट करू शकता. आजच्या या लेखात जाणून घेऊयात अशा काही सुपरफूड बद्दल जे आपला मूड रिफ्रेश करू शकतील.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरात हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे मूड सुधारतो. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे तणावाशी लढण्यास मदत करतात. मात्र डार्क चॉकलेट मर्यादित प्रमाणातच खावे. जास्त प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
केळी हे सहज पचणारे फळ आहे. केळीमध्ये व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि ट्रिप्टोफॅन हे घटक आढळतात, जे मन शांत ठेवतात. हे शरीरात मूड सुधारणारे फील-गुड न्यूरोट्रांसमीटर वाढवते.
नट्समध्ये मॅग्नेशियम आणि निरोगी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात. हे ताण कमी करण्यास उपयुक्त आहे. अक्रोड हे मानसिक आरोग्यासाठी विशेषतः चांगले असते आणि मूड स्थिर ठेवण्यास मदत करतात. दररोज सकाळी हे ड्रायफ्रुट्स नक्कीच खावेत.
ब्लूबेरी हे एक फळ आहे ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीराला हानिकारक स्ट्रेसपासून वाचवण्याचे काम करतात. याशिवाय आनंदाचे हार्मोन्स देखील रिलीज होतात. यामुळे तुम्हाला बरे वाटते.
ग्रीन टीमध्ये एल-थियानाइन नावाचा एक विशेष घटक आढळतो. हे विशेषतः मनाला आराम देते. याशिवाय, ते तणाव आल्यावर होणारे परिणाम देखील कमी करते. हिरव्या भाज्यांमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास देखील मदत होते.
हेही वाचा : Fertility : अपुऱ्या झोपेचा प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम
संपादित – तनवी गुडे