Mangesh Makar : साताऱ्याच्या पठ्ठ्याची कमाल! एका वर्षात सात पदांना गवसणी
Sarkarnama April 20, 2025 07:45 PM
Mangesh Makar शासकीय नोकरी

आजकाल शासकीय नोकरी मिळणे म्हणजे एक दिवास्वप्न बनले आहे.

Mangesh Makar जिद्द आणि चिकाटी

पण जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न केल्यास कर्तृत्व आणि स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागत नाही

Mangesh Makar मंगेश मोहन माकर

अशीच स्वप्नपूर्ती केली आहे साताऱ्याच्या कोरेगावमधील भंडारमाची छोट्याशा खेड्यातील मंगेश मोहन माकरने

Mangesh Makar सात शासकीय पदं

मंगेश मोहन माकरने एकाच वर्षात तब्बल सात शासकीय पदांना गवसणी घालून नवा अध्याय लिहत तुरूणांपुढे आदर्श ठेवला आहे

Mangesh Makar सरळ सेवा परीक्षा

मंगेशनचे आई-वडील अल्पशिक्षित असून त्यांनी त्याच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट केले. तर याने देखील स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करताना सरळ सेवा परीक्षेची तयारी केली

Mangesh Makar प्राथमिक शाळेत शिक्षण

मंगेशनचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण झाले असून अंगापूर येथे मावशीकडे माध्यमिक शिक्षण झाले. तर साताऱ्याच्या एलबीएस महाविद्यालयातून त्याने पदवीचे शिक्षण घेतले.

Mangesh Makar हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ काम

यावेळी त्याने एका हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ काम करत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत सातत्यपूर्ण अभ्यास केला. परीक्षा दिल्या. पण त्याला यश आले नाही.

Mangesh Makar एकाच वर्षात मिळवलेली पदे

2024 मध्ये एकाच वर्षात सार्वजनिक बांधकाम, रक्तपेढी परिचर, नगररचना विभाग, कनिष्ठ सहाय्यक परीक्षा, स्टेनो परीक्षा आणि राज्य उत्पादन शुल्क परिक्षेतही यश मिळवले. आता तो साताऱ्यात जलसंपदा विभागाची परीक्षेत उत्तीर्ण होऊन रुजू झाला आहे.

Gunaratna Sadavarte Biography: गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबतची 'ही' खास गोष्ट अनेकांना माहिती नाही
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.