Kesari 2 Box Office Collection: 'जाट'पेक्षा अक्षय कुमारचा 'केसरी 2' लय भारी; फक्त दोन दिवसांत कमावले इतके कोटी
Saam TV April 20, 2025 07:45 PM

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 2: 'केसरी चॅप्टर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम सुरुवात केली असून दुसऱ्या दिवशीही त्याच्या कमाईत भरघोस वाढ झाली आहे. अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल १७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत असून, चित्रपटाचे सादरीकरण प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी १३.५ कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या आकड्यात लक्षणीय वाढ झाली आणि चित्रपटाची एकूण कमाई ३०.५ कोटींपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसत आहे, त्यामुळे रविवारच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘केसरी चॅप्टर 2’ हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘’चा सिक्वेल असून, यामध्ये नव्या कथा आणि पात्रांची भर पडलेली आहे.

या चित्रपटात ने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आर. माधवनने साकारलेली भूमिका विशेष चर्चेत असून, त्याच्या अभिनयाचे समीक्षकांकडूनही कौतुक होत आहे. अनन्या पांडे हिच्या भूमिकेला तरुण प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शकाने चित्रपटाचे प्रत्येक दृश्य प्रभावी बनवले असून, विशेषतः कोर्टातील डायलॉगबाजी प्रेक्षकांना अधिक आवडत आहे.

चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही उत्तम दर्जाचा आहे. पार्श्वसंगीत, छायाचित्रण आणि संकलन या तिन्ही बाबतीत ‘केसरी चॅप्टर 2’ ने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमावलेल्या १७ कोटींच्या कमाईमुळे या चित्रपटाकडे सकारात्मक दृष्टया पहिला जात असून हा चित्रपट जाट आणि सिकंदर पेक्षा उत्तम असल्याचे प्रेक्षक बोलत आहेत. आता रविवारी मिळणाऱ्या प्रतिसादावर चित्रपटाचे पहिले आठवड्याचे यश अवलंबून आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.