Tahawwur Rana extradition : तहव्वुर राणा पूर्वी कोण-कोणत्या गुन्हेगारांना परदेशातून भारतात आणण्यात आलं
Sarkarnama April 21, 2025 07:45 AM
Tahawwur Rana extradition राणा अमेरिका तुरुंगात

पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वुर राणा वर्षानुवर्षे अमेरिकन तुरुंगात होता.

Tahawwur Rana extradition मुंबई हल्ला

मुंबई हल्ल्याचा मुख्य कट रचणारा डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी याच्या जवळचा सहकारी आहे.

Tahawwur Rana extradition राणाचे प्रत्यार्पण

तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण भारतासाठी खूप महत्वाचे होते. देशाने यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अनेक गुन्हेगारांना परदेशातून आणण्यात आले आहे.

Tahawwur Rana extradition अबू सलेम

1993मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार अबू सलेम याला देखील परदेशातून आणण्यात आलं आहे.

Tahawwur Rana extradition मुंबई साखळी बॉम्ब

अबू सलेम याला मुंबई साखळी बॉम्बस्फोटात आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येच्या आरोपाखाली पोर्तुगालहून आणण्यात आले होते.

Tahawwur Rana extradition पोर्तुगालमधून प्रत्यार्पण

अबू सलेमला 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे.

Tahawwur Rana extradition छोटा राजन

छोटा राजन हा दाऊद इब्राहिमचा जवळचा मित्र असून, जो नंतर स्वतः अंडरवर्ल्ड डॉन बनला. राजनविरुद्ध भारतात अनेक गंभीर खटले दाखल आहेत.

Tahawwur Rana extradition इंडोनेशियात अटक

छोटा राजनला 2015मध्ये सीबीआयने इंडोनेशियात अटक केली. त्यावर इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती. यानंतर त्याचे प्रत्यार्पण करून घेण्यात आले.

NEXT : 'या' पोरीनं काय करायचं? 50 प्रमाणपत्र, 10 मेडल तरीही पदरी निराशा...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.