MI vs CSK Live: 'मुंबईकर'च Mumbai Indians चे वैरी! १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेनंतर शिवम दुबेची फटकेबाजी; Dhoni ची फक्त हवा
esakal April 21, 2025 07:45 AM

Mumbai Indians vs Chennai Super Kings Marathi Update: १७ वर्षीय आयुष म्हात्रे आणि शिवम दुबे या मुळच्या मुंबईच्याच खेळाडूंनी ला ईंगा दाखवला. पदार्पणाच्या सामन्यात आयुषने ३२ धावांची वादळी खेळी केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला दुबेने मोठी धावसंख्या उभारून दिली. रवींद्र जडेजानेही उपयुक्त खेळी केली. MS Dhoni फक्त ४ धावा करून माघारी परतल्याने चाहते निराश झाले.

हार्दिक पांड्याने टॉस जिंकून ला प्रथम फलंदाजीला बोलावले. शेक राशीद व रचिन रवींद्र सलामीला आले, परंतु चौथ्या षटकात अश्वनी कुमारने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. १७ वर्षीय आयुष म्हात्रेला आज चेन्नईने पदार्पणाची संधी दिली आणि त्याने सुरुवातही दणक्यात केली. त्याने चौकाराने डावाची सुरुवात केली आणि त्यानंतर दोन खणखणीत षटकार मारून अश्वनीच्या गोलंदाजीची हवा काढली. दीपक चहरसारख्या अनुभवी गोलंदाजांलाही आयुषने सुरेख चौकार खेचले. चहरलने सातव्या षटकात आयुषला माघारी पाठवले. या पोराने १५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने त्याची पाठ थोपटली.

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईकडून पॉवर प्लेमध्ये २ षटकार खेचणारा आयुष हा ऋतुराज गायकवाडनंतर दुसरा फलंदाज ठरला. राहुल त्रिपाठीने १ षटकार खेचला आहे, तर डेव्हॉन कॉनवे व रचिन रवींद्रला पहिल्या सहा षटकांत एकही षटकार खेचता आलेला नाही. CSK कडून पदार्पण करणारा आयुष ( १७ वर्ष व २७८ दिवस) हा सर्वात युवा खेळाडू ठरला. यापूर्वी २००८ मध्ये अभिनव मुकूंदने १८ वर्ष व १३९ दिवसांचा असताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण केले होते.

आयुषच्या विकेटनंतर CSK च्या धावांचा वेग काहीसा मंदावला. त्यात राशीद ( १९) मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र जडेजा व शिवम दुबे यांनी CSK ची धावगती सातच्या सरासरीने कायम राखली होती. चेन्नईने १३.३ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या. हार्दिकला रवींद्रने मारलेल्या षटकाराने संघाचे शतक पूर्ण झाले. चहरने त्याच्या स्पेलमध्ये ३२ धावांत १ विकेट घेतली. ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमराहचे प्रत्येकी २ षटकं मुंबईने राखून ठेवली होती.

ट्रेंट बोल्टला १५ व्या षटकात हार्दिकने आणले आणि दुबेने १५ धावा कुटल्या. मुळचा मुंबईचाच असलेल्या दुबेला ३७ धावांवर जसप्रीतने जीवदान दिले. त्याने झेल सोडला आणि सोबत षटकारही दिला. त्यापुढचा चेंडूवर दुबेने खणखणीत षटकार खेचला आणि ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अश्वनीने टाकलेल्या १६व्या षटकात २६ धावा चोपल्या गेल्या. दुबे ३२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५० धावांवर जसप्रीतच्या गोलंदाजीवर बाद झाला. मिचेल सँटनरने १८व्या षटकात फक्त ५ धावा दिल्या.

१९व्या षटकात धोनी मोठा फटका मारायला गेला, परंतु त्याचा ४ धावांवर तिलक वर्माने झेल घेतला. जड्डूने ३५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. चेन्नईने ५ बाद १७६ धावा उभ्या केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.