आपल्याला कोहिनूर हिरा मिळालाय! संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश, बावनकुळेंचा आनंद गगनात मावेना
Marathi April 22, 2025 04:36 PM

चंद्रशेखर बावंकुले: विदर्भातला एक काँग्रेसचा नेता मागील चार दिवसापासून फोन करत होता आणि विचारना करत होता की, खरच संग्राम थोपटे  (Sangram Thopate) येताय का? त्यावर आम्ही म्हटलं, हो खरच थोपटे येताय. काँग्रेस पक्षाचे पतन होण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. काँग्रेस पक्षाला लयाला जाणार हा दिवस आहे. आम्ही जेव्हा संग्राम थोपटे यांना भेटलो तेव्हा त्यांना विचारलं की तुमचं म्हणणं काय आहे? त्यावेळी त्यांनी सांगितलं मला काही नको, फक्त माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा, असे ते म्हणाले. त्यामुळे संग्राम थोपटेंच्या रूपाने कोहिनूर हिरा आपल्याला मिळाला असल्याची बोलकी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.

संग्राम थोपटेंनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा मोठा निर्णय घेतला. येत्या 22 एप्रिलला संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

….त्यामुळे संग्राम थोपटे आज आपल्यापर्यंत आले- चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस पक्षाने आचार, विचार, सत्व सगळं सोडून दिले आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन भारताचे बदनामी करतात, ते म्हणतात निवडणूक आयोग चुकीचं काम करत आहे. जेंव्हा महाविकास आघाडीचे खासदार लोकसभेत निवडून आले तेव्हा आम्ही कधीच निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं नाही. महाविकास आघाडीमध्ये आठ बोर्ड मुख्यमंत्री पदाचे लागले होते. भाजप, महायुती पुढे गेली पाहिजे हा विचार आम्ही केला. मुख्यमंत्री पदाचा विचार आम्ही कधी केला नाही. मात्र या उलट काँग्रेसमध्ये ओढाओढी आहे. त्यामुळे संग्राम थोपटे आज आपल्यापर्यंत आले आहेत असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

काँग्रेसमध्ये केवळ चापलुसीचं राजकारण- चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल कधीच विचार संग्राम यांनी केला नाही. चापलुसीचं राजकारण काँग्रेसमध्ये आहे. भाजपमध्ये असं नाहीये. माझ्यासारखा साधा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होतो, ही भाजपची संस्कृती असल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे.

हर्षवर्धन सकपाळ यांनी पोरकटपणा सोडून द्यावा- चंद्रशेखर बावनकुळे

दीड कोटीची जाहिरात 150 कोटींची दाखवणं हा बालिशपणा असल्याचे संगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सपकाळ माध्यमांत झळकत राहण्यासाठी असा पोरकटपणा करतात, तेव्हा त्यांची कीव येते, असेही ते म्हणाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून ही पोस्ट करत टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

सपकाळ अजून खूप लहान आहेत. मोठा पल्ला त्यांना गाठावा लागेल. पण त्यासाठी आधी पोरकटपणा सोडून द्यावा लागेल. झाले असे की, चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी काल दि. 21 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरने एक जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीची रिलीज ऑर्डर देताना ती दीड कोटींची असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद आहे. ती मराठी आणि लोकमत अशा दोन वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. मराठी त ती योग्य प्रकाशित झाली आहे. पण लोकमतमध्ये शेवटच्या दोन शून्यापूर्वी असलेला टिंब अनवधानाने काढून टाकण्यात आल्याने ती 150 कोटींची दिसते. वास्तविक ही त्या वर्तमानपत्राची तांत्रिक चूक आहे. कॅामा आणि टिंब यात संबंधित वर्तमानपत्राने अनवधानाने गल्लत केल्याने असा प्रकार झाला आहे. वर्तमानपत्रांना दिलेला जाहिरातीचा रिलीज ऑर्डर किंवा संकेतस्थळावर ती बिनचूक आहे.

असे असतानाही सपकाळ माध्यमांत झळकत राहण्यासाठी असा पोरकटपणा करतात तेव्हा त्यांची कीव येते. त्यांच्याबद्दल कणव व्यक्त करण्याशिवाय आणखी काही करता येईल असे वाटत नाही. असे ही ते म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=nrscuhyxpxs

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.