Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, कोणत्या भागाचा समावेश?
Saam TV April 23, 2025 03:45 AM

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा दिवसभर बंद असणार आहे. पुण्यातील जुनी धायरी परिसरात पाणीपुरवठआ बंद असणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना येत्या बुधवारी पाणी जपून वापरावे लागणार आहे.

गुरुवारी जुनी धायरी परिसराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद असणार आहे. पुण्यात गुरूवारी जुनी धायरी येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून पाण्याची होणारी गळती थांबवणे आणि पारी कंपनी रोड येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्याकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त केली जा आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

पारे कंपनी रोड, गणेश नगर,लिमये नगर गारमळा, गोसावी वस्ती,बारगणी मळा,दळवी वाडी,काबळे वस्ती, मानस परिसर,नाईक आळी,यशवंत विहार बुस्टर संपूर्ण परिसर लेन नंबर 1 ते 34 दोन्ही बाजू, रायकर नगर,चव्हाण बाग,त्रिमूर्ती हॉस्पिटल या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जळगावात लाखो लीटर पाणी वाया

चाळीसगाव शहराची पिण्याची पाइपलाइन फुटली आहे. खोदकाम करत असताना शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम केले जात असताना पाइपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अर्धे चाळीसगाव शहर जलवाहिनीवर अवलंबून असल्याने शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.