प्रत्येक शेअरवर ६ रुपयांचा लाभांश जाहीर; ७० देशात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या नफ्यात १६% वाढ
Havells India Q4 Results : ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी हॅवेल्स इंडियाने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले असून आर्थिक वर्ष २०२५ च्या मार्च तिमाहीत कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत नफा १५.७% वाढला. तसेच, या कालावधीत महसुलात २०.२% पेक्षा जास्त वाढ दिसून आली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) हा शेअर १.०३ टक्क्यांच्या वाढीसह १६६४.७५ रुपयांवर बंद झाला. नफ्यात १५.७% वाढनियामक फाइलिंगनुसार ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी हॅवेल्स इंडियाचा नफा मार्च तिमाहीत १५.७% वाढून ५१७ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ४४७ कोटी रुपये होता. तसेच, कंपनीचे उत्पन्न मार्च तिमाहीत वार्षिक आधारावर २०.२ टक्क्यांनी वाढले आणि ५,४४२ कोटी रुपयांवरून ६,५४४.६ कोटी रुपयांवर पोहोचले. वार्षिक आधारावर कंपनीचा EBITDA म्हणजेच ऑपरेटिंग नफा १९.३ टक्क्यांनी वाढला आणि तो ६३५ कोटी रुपयांवरून ७५७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मार्जिनमध्ये घटमार्च तिमाहीत हॅवेल इंडियाचे मार्जिन थोडे कमी झाले आणि ते ११.७ टक्क्यांवरून ११.६ टक्क्यांवर आले. ६००% लाभांश जाहीरहॅवेल्स इंडियाच्या संचालक मंडळाने निकालांसह भागधारकांना लाभांशाची भेट दिली आहे. मंडळाने प्रति शेअर ६ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे, म्हणजेच १ रुपयांच्या दर्शनी मूल्यावर ६००% इतका होय. हा २०२४-२५ या आर्थिक वर्षात घोषित केलेल्या अंतरिम लाभांशाव्यतिरिक्त आहे, जो प्रति शेअर ४ रुपये आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीनंतर ३० दिवसांच्या आत अंतिम लाभांश दिला जाईल. शेअर्सची बाजारातील कामगिरीहॅवेल्स इंडियाच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,१०४.९५ रुपये आहे. जो त्याने २३ सप्टेंबर २०२४ रोजी नोंदवला होता. तसेच ५२ आठवड्यांचा नीचांक १,३६०.०५ रुपये आहे. जर आपण शेअरच्या कामगिरीवर नजर टाकली तर गेल्या २ आठवड्यात त्यात १३.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या वर्षी ती ७.४१ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या २ वर्षात या शेअरमध्ये ३७.८५ टक्के आणि ५ वर्षात २२२ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे बीएसई वर बाजार भांडवल १,०४,३७०.१२ कोटी रुपये आहे.