PSL 2025 : काय हे पाकिस्तानी...! विकेट घेतल्यावर उत्साहात स्वतःच्याच खेळाडूच्या डोक्यावर मारलं; नेमकं काय घडलं? पाहा Video
esakal April 23, 2025 08:45 PM

Bowler Hits Wicketkeeper During Celebration : पाकिस्तान सुपर लीगमध्ये मंगळवारी मुलतान सुलतान्स विरुद्ध लाहोर कलंदर यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान एका मजेशीर घटना घडली. यावेळी गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर उत्साहात चक्क विकेटकिपरला डोक्यावर मारलं. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

नेमकं काय घडलं?

मुलतान सुलतान संघाची गोलंदजी सुरु असताना १५व्या षटकात वेगवान गोलंदाज उबेद शाह याने लाहोरच्या सॅम बिलिंग्सची विकेट घेतली. बिलिंग्स त्यावेळी ४३ धावांवर खेळत होता. तत्पूर्वी त्याने उबेदला दोन षटकार ठोकले होते, पण षटकातील शेवटच्या चेंडूवर उबेदने त्याला बाद केलं.

यावेळी विकेट घेतल्याचा आनंद साजरा करताना उबेदने जोरदार सेलिब्रेशन केलं. पण या उत्साहात त्याचा हात थेट विकेटकिपर उस्मान खानच्या डोक्याला लागला. त्यामुळे उस्मान खान जमिनीवर पडला. त्यामुळे लगेच फिजिओला बोलवण्यात आलं. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, या सामन्यात मुलतान सुलतानकडून उबेदने ४ षटकांत ३७ धावा देत ३ बळी घेतले. तसेच मायकेल ब्रेसवेल आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या सामन्यात लाहोरचा संपूर्ण संघ १९५ धावांवर बाद झाला. लाहौरकडून सिकंदर रझाने २७ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. मात्र, त्याचं अर्धशतक व्यर्थ गेली.

तत्पूर्वी मुलतानने प्रथम फलंदाजी लाहौरपुढे २२८ धावांचं लक्ष ठेवलं होतं. यावेळी यासिर खानने ४४ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिझवानने ३२ आणि उस्मान खानने ३९ धावा केल्या. इफ्तिखार अहमदने १८ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.