
पदवीच्या तीन आणि चार वर्षांच्या विविध अभ्यासक्रमांकरिता मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली आहे. विद्यापीठाशी संलग्नित, स्वायत्त महाविद्यालये, विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-2026साठी ही नोंदणी केली जात आहे. पदवी-पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाकरिता ही नोंदणी केली जाते. पदव्युत्तरच्या 133 अभ्यासक्रमांचे प्रवेश या नोंदणीद्वारे होतात. विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे.