नीरज गुप्ता आता एक नवीन जबाबदारी आहे.
Marathi April 24, 2025 09:28 AM

एनएसई इंटरनॅशनल एक्स्चेंजचे नवे अध्यक्ष

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माजी आयएएस अधिकारी नीरज कुमार गुप्ता यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. ते नीरज कुमार गुप्ता हे 19 एप्रिल 2025 पासून एनएसई इंटरनॅशनल एक्स्चेंजचे अध्यक्ष आणि पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर (पीआयडी) म्हणून रुजू झाले आहेत. ‘आयएफएससीई’ने (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण) गव्हर्निंग बोर्डावर त्यांची नियुक्ती मंजूर केली आहे. गुप्ता यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून दीर्घ अनुभव आहे. त्यांचा अनुभव एनएसई आणि गिफ्ट सिटी इकोसिस्टमच्या वाढीस मदत करेल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

नीरज कुमार गुप्ता हे 1982 च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. 2018 मध्ये ते अर्थ मंत्रालयातून सचिव म्हणून निवृत्त झाले. अर्थ मंत्रालयात त्यांनी भारत सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागात काम केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांची केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून पुन्हा नियुक्ती केली. त्यांचा कार्यकाळ 2023 मध्ये पूर्ण केला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.