भिवंडी बातम्या: भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात भंगारच्या गोदामाला भीषण आग लागण्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या आगीत गोदामात ठेवण्यात आलेले कागदी पुठ्ठा तसेच भंगार वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले आहेत.
या भंगार गोदामाला लागलेली आग नक्की कोणत्या कारणाने लागली आहे हे अजूनही समजू शकलेले नसून, या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. शिवाय लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झाला आहे.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, मात्र अजूनही अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम सुरू आहे.