बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा. यमगे ता. कागल. जि. कोल्हापूर). वडील मेंढपाळ, घरात कोणतीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. UPSC च्या निकालाने नशिब पालटले. UPSC निकाल आला तेव्हा बिरदेव सिध्दाप्पा डोणे हा मेंढ्या चारत होता. त्याला देशात 551 वी रँक मिळाली आहे. तो IPS अधिकारी झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बिरदेव सिध्दाप्पा डोणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दोन वर्षे दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत होता. त्यानंतर तो पुन्हा पुण्यात आला. तिथे सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करू लागला. त्याने आतापर्यंत दोन वेळा ही परीक्षा दिली होती पण त्याला यशाने हुलकावणी दिली होती. जिद्दीने त्याने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली. यामध्ये उज्वल यश मिळवत त्याने देशात 551 वी रँक मिळवली.
रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत लिहिलं आहे की, “माळरानातला #हिरा महाराष्ट्राचं मन जिंकलस बिरदेवा तू…! यमगे (ता. कागल) येथील बिरदेव सिद्धप्पा डोणे या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने #UPSC परीक्षेत मिळवलेलं यश हे खऱ्या अर्थाने डोळे दिपवणारं असं नेत्रदीपक आहे… आज मेंढरं राखणारा बिरदेव उद्या अधिकारी म्हणून इतरांसोबतच याच मेंढपाळ बांधवांसाठीही पॉलिसी आखणार आहे.. त्यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा!!!”
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव याने देशात 551 वी रँक मिळवली आहे. निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडील यांच्यासह बेळगाव परिसरामध्ये बकरी चारण्यासाठी गेला होता. मंगळवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्या वेळी बीरदेव हा बेळगाव जिल्हयातील मामाच्या गावी होता. मेंढ्या राखत होता.
बीरदेवच्या यशात कुटुंबांचा मोठा वाटा आहे. बीरदेवचे वडील सिद्धापा डोणे हे बारावीपर्यंत शिकले आहेत. त्यांनी मुलाला उच्चपदस्थ अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने शिक्षण दिले. बीरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा चार वर्षापूर्वी भारतीय सैन्यात भरती झाला आहे.
डोणे कुटुंबीयांची परिस्थिती बेताची. दिल्लीतील खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे ‘या परीक्षेचा नाद सोड आणि एखादी नोकरी कर,’ असा सल्ला वडिलांना दिला होता. मात्र, बीरदेव जिद्दी होता. आयपीएस होणारच हे त्याने सांगितले होते. अखेर त्यांनी शब्द खरा करून दाखविला.
बिरप्पा यांचे यश हे केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. ध्येय स्पष्ट असेल आणि मेहनत खरी असेल तर कोणीही आपलं स्वप्न साकार करू शकतं, हे त्याच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी दाखवते. आता बिरप्पा केवळ अधिकारी होण्याच्या वाटेवर नाही, तर त्यांच्यासारख्या अनेक तरुणांसाठी तो आशेचा किरण आहे.