२७ एप्रिलचा दिवस मुंबई इंडियन्स मुंबईतील विविध स्तरातील मुलांसाठी एक खास गिफ्ट देणार आहे. वास्तविक लखनऊ सुपर जायंट्सच्या विरोधात वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या मॅच दरम्यान फ्रेंचाइजी विविध स्तरातून आलेल्या तब्बल १९००० मुलांना गिफ्ट देणार आहे. यात २०० स्पेशल मुले देखील सामील होणार आहेत. हे सर्व जण आपआपल्या ऑयडॉलला लाईव्ह खेळताना पाहू शकणार आहेत. यांना सामना संपूर्णपणे मोफत पाहायला मिळणार आहे. या दिवशी मुंबई इंडियन्सच्या वतीने एज्युकेशन एण्ड स्पोर्ट्स फॉर ऑल इव्हेंटचे (ESA) सेलिब्रेट केले जाणार आहे. या फ्रेंचायजीची मालकीण नीता अंबानी यांनी या उपक्रमाची सुरुवात साल २०१० रोजी केली होती. त्यानंतर आयपीएल ( IPL) दरवर्षी हा इव्हेंट मुंबईच्या कोणत्याही एका मॅचमध्ये आयोजित करत असते.
मुलांना लाईव्ह क्रिकेटचा थरार पाहाता येणार आहे, यावेळी मुलांना आपल्या आवडत्या आयकॉन क्रिकेटस्टारशी बोलण्याची आणि वानखेडे स्टेडियमच्या जल्लोषपूर्ण वातावरणात सामन्याचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. हजारो मुलांना पहिल्यांदाच लाईव्ह क्रिकेट पाहण्यासाठी सधी मिळणार आहे. रिलायन्स फाउंडेशनने यासाठी विविध NGO शीं यासंदर्भात करार केला आहे.मुलांचे स्वागत करण्यापूर्वी नीता अंबानी यांनी त्यांच्या संघातील खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाला, “त्यांच्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा.कारण ते क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी रांगेत उभे राहतात असेही नीता अंबानी यावेळी म्हणाल्या..
येथे पाहा पोस्ट –
नीता अंबानी यांनी एका छोट्या मुलीची कहानी देखील ऐकविली..त्या म्हणाल्या की,“एक कहानी माझ्या हृदयात जपून ठेवली खूपच जवळ आहे. आम्ही दिवसभर त्यांना चार वेळा जेवणाची पॅकेट्स देतो.मी सर्व मुलांसोबत स्टँडमध्ये मॅचचा आनंद घेत होती. तेव्हा मी पाहिले की एक मुलगी काही खातच नव्हती.तिने ही फूड्स पॅकेट्स स्वत:जवळच जपून ठेवली होती. मी तिला विचारले की तू खात का नाहीस..तेव्हा तिने सांगितले की माझ्या भावासाठी राखून ठेवत आहे. कारण त्यांनी जीवनात कधी केक खाल्ला नाही हीच ती कहानी आहे. जी मी जगाला सांगू इच्छीते..आम्ही या मुलांना प्रोत्साहन देत आहोत. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरुन येणाऱ्या या मुलांना सांगू शकतो की तुम्ही चमत्कार करु शकता.”
२०१० मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामुळे सर्व वर्गातील मुलांना शिक्षण आणि खेळाचा आनंद देणे आहे.यामुळे तरुणांना खेळात आणि शिक्षणाची संधी देण्यासाठी आयोजित केला जात असतो. मुंबई इंडियन्सचा हा उपक्रम नव्या पिढीला दोन्ही क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत राहणार आहे. तसेच त्यांना सक्षम देखील करणार आहे असे नीता अंबानी यांनी म्हटले आहे.