Hair Care Tips : हेयर मास्क आणि कंडीशनरपैकी काय उत्तम ?
Marathi April 25, 2025 06:26 PM

केसांची काळजी घेण्यासाठी लोक विविध प्रकारचे हेअर प्रोडक्ट्स वापरतात. यापैकी, हेयर मास्क आणि हेयर कंडिशनर सर्वात सामान्य आहेत. लोक शॅम्पू केल्यानंतर प्रत्येक वेळी केसांना कंडिशनर लावतात, तर काही जण शॅम्पू केल्यानंतर हेअर मास्क लावणे पसंत करतात. हे दोन्हीही केस कोरडे होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. पण तुम्हाला हेअर मास्क आणि हेअर कंडिशनरमधील फरक माहीत आहे का? किंवा केसांसाठी कोणता हेअर मास्क आणि कंडिशनर जास्त फायदेशीर ठरू शकतो? याचविषयी जाणून घेऊयात आजच्या या लेखाच्या माध्यमातून.

तज्ञ काय म्हणतात?

हेयर मास्क आणि हेयर कंडिशनर दोन्ही केसांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करतात. केसांचे कंडिशनर केसांवर जेल मॉइश्चरायझरसारखे काम करते, तर हेअर मास्क क्रीम मॉइश्चरायझरसारखे काम करते. म्हणजेच कंडिशनर थोडे पातळ असते आणि हेअर मास्क थोडे जाड असतात.

केसांसाठी फायदेशीर काय?

त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, हेअर मास्क आणि हेअर कंडिशनरमध्ये काय चांगले आहे हे तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून असते.

कोरडे केस

जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर तुमच्यासाठी हेअर मास्क वापरणे चांगले. आठवड्यातून एकदा शॅम्पू केल्यानंतर तुम्ही हेअर मास्क वापरू शकता. हेअर मास्कचा फॉर्म्युला कोरड्या केसांना खोलवर पोषण देऊन ओलावा वाढविण्यास मदत करतो, तसेच डॅमेज झालेले केस दुरुस्त करण्यास देखील मदत करतो.

पातळ केस

जर तुमचे केस थोडे पातळ असतील किंवा केसांचा व्हॉल्यूम कमी असेल तर केसांचे कंडिशनर वापरणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. त्वचारोगतज्ज्ञ अशा केसांना शॅम्पू केल्यानंतर प्रत्येक वेळी कंडिशनर लावण्याचा सल्ला देतात.

अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेयर कंडिशनर किंवा हेयर मास्क निवडू शकता.

हेही वाचा : Diet Tips : डाएटिंगदरम्यान गोड खाण्यावर असा ठेवा कंट्रोल


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.