माणूस हा मुळात निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे आपण जेव्हा निसर्गाच्या जवळ जातो, तेव्हा फ्रेश होतो. घराला बाल्कनी किंवा टेरेस असेल, तर त्यात कुंड्या ठेवून आपण छान बाग करू शकतोच; पण ते शक्य नसेल, तर घरात इनडोअर प्लॅंट्सचा वापर करून मूड फ्रेश करता येतो.
इनडोअर प्लॅंट्स केवळ घराला सजावटीचं रूपच देत नाहीत, तर वातावरण शुद्ध करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरतात. योग्य प्लॅंट्स निवडून, त्यांना योग्य पद्धतीनं लावून आणि योग्य प्रकारे काळजी घेऊन तुमच्या घराला सुंदरतेचा टच देता येतो. त्यायासाठी काही उपयुक्त टिप्स बघूया.
योग्य प्लॅंट्सची निवडघरातील प्रकाश, तापमान आणि ओलावा लक्षात घेऊन प्लॅंट्स निवडा.
स्नेक प्लॅंट (सन्सेव्हिया) : कमी प्रकाशात वाढते, काळजी कमी लागते.
मनी प्लॅंट : खूप काळापासून वापरात असलेला हा प्रकार. लटकत किंवा चढत वाढणारी ही वेल सजावटीसाठी उत्तम.
पीस लिली : फुलांच्या सुगंधासह हवा शुद्ध करते.
स्पायडर प्लॅंट : हवेतील विषारी पदार्थ शोषून घेते. त्याच्या विशिष्ट रूपामुळे आणि तुऱ्यांमुळे कारंज्याचा भास होतो.
अलोव्हेरा : औषधी गुणधर्मासह सजावटीसाठी उपयुक्त.
सूर्यप्रकाश मिळणाऱ्या खिडकीजवळ : फ्लॉवरिंग प्लॅंट्सना (उदाहरणार्थ, ऑर्किड, जरबेरा) सूर्यप्रकाश लागतो, त्यामुळे अशी झाडं असलेल्या कुंड्या इथं ठेवू शकता.
लिव्हिंग रूममध्ये : मोठ्या पानांचे प्लॅंट्स (उदाहरणार्थ, फिडल लीफ फिग, मॉन्स्टेरा) स्टेटमेंट पीस म्हणून वापरा.
बाथरूममध्ये : फर्न्स किंवा बांबू प्लॅंट्स ओलसर वातावरणात टिकतात.
बेडरूममध्ये : लॅव्हेंडर किंवा स्नेक प्लॅंट्स ऑक्सिजन लेव्हल वाढवतात.
हँगिंग पॉट्स : मनी प्लॅंट किंवा स्ट्रिंग ऑफ पर्ल्ससाठी छान दिसतात.
मॉडर्न सिरॅमिक पॉट्स : मिनिमलिस्ट डेकोरला साजेशी दिसतात.
वूडन प्लॅंट स्टँड : मल्टी-लेव्हल स्टँडवर प्लॅंट्स लावून व्हिज्युअल इंटरेस्ट तुम्ही वाढवू शकता.
जास्त पाणी देऊ नका : बहुतेक प्लॅंट्स ओव्हरवॉटरिंगमुळे मरतात.
पानांना पुसून घ्या : धूळ काढून प्रकाशसंश्लेषणास मदत करा.
वेळोवेळी खत द्या : नैसर्गिक खतांनी प्लॅंट्स हिरवेगार राहतात.
टेरारियम : लहान सक्युलेंट्स किंवा एर प्लॅंट्ससह मिनी गार्डन तयार करा.
वॉल गार्डन : वर्टिकल गार्डनिंगसाठी वॉल माउंटेड प्लॅंटर्स वापरा.
बुकशेल्फ डेकोर : छोट्या प्लॅंट्स बुकशेल्फवर ठेवून स्टायलिश लूक द्या.
मसाले, स्वयंपाकासाठीची झाडे : स्वयंपाकघरात मसाले किंवा इतर गोष्टींसाठी मदत करणाऱ्या झाडांच्या कुंड्या ठेवू शकता.
इनडोअर प्लॅंट्स घराला नैसर्गिक सौंदर्य देण्यासोबतच तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. थोड्या नियोजनाने तुम्हीही तुमच्या घराला हिरव्यागार चैतन्यमय बनवू शकता!