Aastad Kale : "छावा वाईट फिल्म...", आस्ताद काळे असं का म्हणाला? आधी बरळला आता दिलं स्पष्टीकरण
Saam TV April 26, 2025 05:45 PM

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava ) जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने सर्वांना वेड लावले आहे. 'छावा'ने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाला सुरुवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशल पाहायला मिळाला.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वत्र चित्रपटाचे कौतुक पाहायला मिळाले. मात्र मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेने (Aastad Kale) '' चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करत 'छावा वाईट फिल्म...' असल्याचे बोला होता. मराठी अभिनेता आस्ताद काळेने नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या अशा विधानामागचे मत मांडले आहे. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात.

अलिकडेच मराठी अभिनेता काळेने 'छावा' चित्रपट संबंधित पोस्ट केल्या होत्या. ज्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. आता यावर आस्तादने आपले मत मांडले आहे. आस्तादने पोस्टमध्ये म्हटलं होत की, "'छावा' चित्रपट आहे" यावर आपले मत मांडत आस्ताद म्हणाला की, मला 'छावा' चित्रपट आवडला नाही हे माझे वैयक्तिक मत आहे.

या बद्दल पुढे आस्ताद म्हणाला की, "महाराजांच्या नऊ वर्षांच्या काळाबद्दल दोन चित्रपट करण्याचा निर्णय तुम्ही का नाही घेतला? सर्व एकाच चित्रपटात का दाखवलं? 'बाहुबली'सारखी काल्पनिक गोष्ट दोन भागात दाखवण्यात आली. मग 'छावा' चित्रपट का नाही दाखवण्यात आला? तुम्ही चित्रपटासाठी खूप कष्ट घ्या. खूप वरवर आणि विषयाच्या खोलात न जाता हा चित्रपट बनवण्यात आला त्यामुळे तो मला आवडला नाही. "

'छावा' चित्रपटातील 'महाराणी सोयराबाई'च्या भूमिकेबद्दल बोलताना आस्ताद म्हणाला की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांच्या पत्नी भर दरबारात परपुरुषांसमोर पान खातात हे कसं शक्य आहे. जे चित्रपटात दाखवलं आहे. "

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.