मुरबाड (वार्ताहर)ः ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत मुरबाड पंचायत समितीमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत रोहन घुगे यांनी प्रशासकीय कामकाजाबाबत कर्मचारी यांनी कार्यविवरणपत्र, ई ऑफिस कार्यप्रणाली सुरळीतपणे पार पाडणे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे. तसेच १०० दिवसीय आराखड्यातील सर्व कामे तीन दिवसांत पूर्ण करावीत. याचबरोबर घरकुलांना सात दिवसांची मंजुरी द्यावी. स्वच्छ भारत मिशन योजनेच्या कामांचा आढावा घ्यावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे तसेच मुरबाड पंचायत गटविकास अधिकारी लता गायकवाड, सर्व तालुका विभागप्रमुख, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.