Miraj News : बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाजण मुद्देमालासह ताब्यात
Saam TV April 27, 2025 06:45 PM

सांगली : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर केला जात असतो. प्रामुख्याने गाड्यांमध्ये गॅस रिफिलिंग करत भराला जात असतो. अशा प्रकारे मिरज शहरातील मालगाव रस्त्यावरील खोतनगर येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून पाच सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार व पाईप या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

घरगुती चा अवैध वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतो. रिक्षा, गाड्यांमध्ये गॅस सिलेंडरमधील गॅस टाकून वापरला जात असतो. मुळात असे करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील चोरून हा गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यानुसारच्या मिरज येथे गॅस रिफिलिंग करण्यासाठी पत्री शेड टाकून अवैध व्यवसाय चालविला जात होता. दरम्यान पोलिस अधीक्षक संदीप घुगे व अपर अधीक्षक रितू खोखर यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला बेकायदा गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर छापे मारण्याचे आदेश दिले आहेत. 

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकला छापा 

त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे एक पथक कारवाईसाठी सज्ज केले होते. पथकातील कर्मचारी यांना माहिती प्राप्त झाली की अभिजित लोहार हा तील खोत मळ्यातील घराबाहेर उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरचा साठा व गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने लोहार याच्या घरावर छापा मारला. 

मुद्देमालासह एकजण ताब्यात 

याठिकाणी झडती घेतल्यानंतर शेडमध्ये पाच गॅस सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, रेग्युलेटर व रोख १२०० रूपये असा २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे गॅस सिलिंडर बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस कर्मचारी अनंत कुडाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.