Padma Awards: आर अश्विन, ऑलिम्पिक पदक विजेता पीआर श्रीजेश यांचा पद्म पुरस्काराने गौरव; पाहा Video
esakal April 29, 2025 02:45 AM

सोमवारी (२८ एप्रिल) नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला. यावेळी पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. पद्म पुरस्कार हे भारतरत्न पुरस्कारानंतरचे भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत.

पद्मश्री हा चौथा सर्वोच्च, पद्म भूषण हा तिसरा सर्वोच्च, तर पद्म विभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन आणि दोनवेळचा ऑलिम्पिक पदकविजेता हॉकीपटू पीआर श्रीजेश यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले होते. हे दोघेही या पुरस्कारासाठी सोमवारी राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.

पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याने या सोहळ्यावेळी सिल्क शर्ट आणि पारंपारिक मुंडू असा वेष परिधान केला होता. त्याचे कुटुंबिय देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

याला पद्मश्री जाहीर झाला असून तो निळ्या रंगाच्या सुटमध्ये हजर होता. या दोघांशिवाय फुटबॉलपटू आयएम विजयन, पॅरा प्रशिक्षक सत्यपाल सिंग आणि पॅरा तिरंदाज हरविंदर सिंग यांनाही यावर्षीचे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते.

जवळपास १८ वर्षे भारताकडून हॉकी खेळला असून तो सर्वोत्तम गोलकिपरही ठरला. त्याने भारताला टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिक या स्पर्धांमध्ये कांस्य पदक जिंकून देण्याच महत्त्वाचे योगदान दिले होते.

तसेच तो २०१४ आणि २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातही होता. त्याला सर्वोत्तम गोलकिपर म्हणून २०२०, २०२२ आणि २०२४ मध्ये पुरस्कार मिळाले आहे. सध्या तो ज्युनियर संघाचा प्रशिक्षकपद सांभाळत आहे. २०१९ साली त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०६ कसोटीत ५३७ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याने ६ शतकांसह ३५०३ धावा देखील केल्या आहेत. ११६ वनडे सामन्यांमध्ये त्याने १५६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर वनडेत ७०७ धावाही आहेत. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याने ६५ सामन्यांत ७२ विकेट्स घेतल्या आहेत.

आयएम विजयन हे भारतासाठी स्ट्रायकर म्हणून खेळले, त्यांनी ७२ सामन्यांत २९ गोल केले आहेत. तो २००० ते २००४ दरम्यान भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार होते. पॅरा तिरंदाज हरविंदर सिंगने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक, तर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.