सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यामूर्ती आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी चेअरमन मार्कंडेय काटजू यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने खळबळ उडालीय. मित्रांनो मला मरायचंय. देशासाठी मी माझं कर्तव्य बजावलंय. आता मला विश्रांतीची गरज असल्याचं मार्कंडेय काटजू यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचीच घोषणा केलीय. तर पाकिस्तानकडूनही युद्धाच्या वल्गना केल्या जात आहेत. दोन्ही देशांकडून होणाऱ्या घोषणा आणि धमक्यांवरही मार्कंडेय काटजू यांनी पोस्ट केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, भारत आणि पाकिस्तान यांची नुरा कुस्ती सुरू आहे. दोघांनाही माहितीय खरं युद्ध दोन्ही देशांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणारं आणि दिवाळखोरीची वेळ आणणारं आहे.