उद्वाहनाच्या पोकळीत पडून मृत्यू
मुंबई : घोडपदेव परिसरातील अष्टविनायक इमारतीतील उद्वाहनाच्या पोकळीमध्ये पडून रामशरण गुप्ता या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.२७) रोजी घडली. विजपुरवठा खंडीत झाल्याने उद्वाहनामध्ये कोणी अडकले नाही ना याची खात्री करण्यासाठी यादव यांनी त्याच्याजवळील चावीने उद्वाहनाचे दार उघडून खाली पोकळीत वाकून पाहिले. त्याचवेळी त्याचा तोल गेल्याने ते खाली पडल्याचे पोलिसांनी सांगितले.