Pahalgam Attack Impact : पोटच्या लेकरांपासून ताटातूट, भारत-पाकिस्तान सीमेवरील हे फोटो पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी...
Sarkarnama April 29, 2025 07:45 PM
India-Pakistan Citizens Leaving Country पासपोर्ट तपासणी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान सोडले होते. या फोटोत रविवारी भारतातून पाकिस्तानात प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचे पासपोर्ट तपासले जात आहेत.

India-Pakistan Citizens Leaving Country व्हिसा रद्द

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशाच्या बाहेर काढले. हल्ल्यात सहभागी असल्याचा भारताचा आरोप फेटाळणाऱ्या पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून बहुतेक भारतीय नागरिकांचे व्हिसा रद्द केले.

India-Pakistan Citizens Leaving Country पती-पत्नीची ताटातूट

तखत सिंग यांना त्यांच्या पत्नीशिवाय पाकिस्तानला पाठवण्यात आलं. त्यांच्या पत्नीचा पासपोर्ट भारतीय आहे. "तुम्ही आम्हाला असे कसे वेगळे करू शकता? असा सवाल त्यांनी केला.

India-Pakistan Citizens Leaving Country अनेकांच्या डोळ्यात अश्रू

वर्षांनुवर्ष ज्या देशात राहत आलो आहे, तोच देश सोडावा लागतो आहे. अनेकांच्या डोळ्यात यावेळी अश्रू बघायला मिळाले.

India-Pakistan Citizens Leaving Country पाकिस्तानातून येणारे सर्वांधिक

दोन्ही देशांतील नागरीक मायदेशी परतत असून सर्वाधिक संख्या पाकिस्तानातून येणाऱ्या भारतीयांची असल्याचे समोर आले आहे.

India-Pakistan Citizens Leaving Country माय लेकराची ताटातूट

वजिदा खान यांनी अधिकाऱ्यांना तिच्या मुलांसह पाकिस्तानात परत येण्याची परवानगी मिळावी यासाठी दिवसभर प्रयत्न केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांचा पासपोर्ट पाकिस्तानी आहे, पण त्यांच्या मुलांचा पासपोर्ट भारतीय आहे.

India-Pakistan Citizens Leaving Country वाट पाहताना महिला

पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी वाट पाहणाऱ्या महिला

India-Pakistan Citizens Leaving Country वाहनांच्या रांगा

सीमेच्या भारतीय बाजूला वाहनांच्या लागलेल्या रांगा

Hindu Population in PoK NEXT : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंदूंची लोकसंख्या किती? रिपोर्ट वाचून बसेल धक्का
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.