शहाजी राजे उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील खोदकामामुळे नागरिकांना अडचण
मालाड, ता. २९ (बातमीदार) ः पार्ले येथील शहाजी राजे उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील खोदकामामुळे नागरिकांना उद्यानात ये-जा करताना अडचण होत आहे. त्यामुळे येथील काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या खोदकामामुळे मागील काही महिन्यांपासून उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. तसेच प्रवेशद्वारासमोर विजेचा बॉक्स असून विजेच्या केबल प्रवेशद्वारासमोर आहेत. हा बॉक्सही निखळल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना भीती वाटत आहे.