Maharashtra Live Update : पीकविमा योजनेत बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली महत्वपूर्ण घोषणा
Sarkarnama April 30, 2025 04:45 AM
Bharat Gogawale Supporter : 'ध्वजारोहणाचा मान गोगावलेंनाच मिळाला पाहिजे', समर्थक भडकले

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या मुख्य झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नियुक्त्या केल्या असून रायगडचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेसह गोगावले समर्थकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पालकमंत्री पदाचा निर्णय काय व्हायचा, कधी व्हायचा तो होईल. पण ध्वजारोहणाचा मान गोगावलेंनाच मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Pahalgam Attack News : काश्मीरमधील 50 पर्यटन स्थळं बंद, जम्मू काश्मीर सरकारचा मोठा निर्णय

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 भारतीय निरपराध पर्यटकांना प्राण गमवावे लागले. ज्याचा प्रत्येक भारतीयांच्या मनावर परिणाम झाला असून पाकिस्तानविरोधात चिड निर्माण झाली आहे. तर पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणीही केली जाते आहे. दरम्यान काश्मीरमधील 50 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने घेतला आहे.

New EV Policy News : इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्ती, राज्य सरकारकडून नवं ईव्ही धोरण मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी सरकारने नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणास मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत काही विशिष्ट इलेक्ट्रिक गाड्यांना काही निवडक रस्त्यांवर टोलमुक्ती दिली जाणार आहे. तसेच प्रवासी इलेक्ट्रिक गाड्यांवर मोठं अनुदान दिलं जाणार आहे.

Pune News : ‘ते चित्र अजूनही आमच्या डोळ्यासमोरून जात नाही आमच्या भावनांशी खेळू नकाश’ : जगदाळे कुटुंबीय

पहलगाम हल्ल्याचा राजकीय विषय करू नये. आमच्या भावनांशी खेळू नका. आमच्यासमोर आमचा माणूस मारला आहे. दहशतवाद्यांची स्टेटमेंट आम्ही सांगून झाली आहेत. त्यांनी बोलून आमच्या लोकांना मारलं आहे. दहशतवाद काय असतो, ते आम्ही त्याठिकाणी अनुभवला आहे. आम्ही त्यांना हात जोडले होते. ते चित्र अजूनही आमच्या डोळ्यासमोरून जात नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांनी माणुसकी दाखवावी, असे आवाहन पुण्याच्या जगदाळे कुटुंबीयांनी केले आहे.

Devendra Fadnavis : सुधारित पीकविमा योजना लागू करणार : देवेंद्र फडणवीस

एक रुपयात पीकविमा योजना सुरू केल्यानंतर लाखो बोगस अर्ज आले होते. त्यामुळे हजारो कोटी रुपयांचा अपव्यय होतो आहे. अशी षडयंत्र काही लोकांनी केली आहेत, त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी सुधारित पद्धतीने पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जेणेकरून विमा कंपन्यांचा नव्हे तर शेतकऱ्यांचा लाभ व्हावा, अशी रचना नव्या विमा योजनेची असणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Mahayuti Government : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे राज्य सरकाडून जाहीर करण्यात आले आहे. असावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

Rohit Pawar : पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंना पाच वर्षे वाट पाहावी लागेल

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद एवढ्यात सुटेल, असे वाटत नाही. रायगड आणि नाशिकचाही तिढा सुटणार नाही. उलट तो वाद आणखी वाढत जाणार आहे. पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल, असे भरत गोगावले गेली वर्षभरापासून म्हणत आहेत. मंत्रिपदासाठी त्यांना अगोदर अडीच वर्षे थांबावं लागलं. आता मंत्री झाले आहेत. पण पालकमंत्रिपदासाठी गोगावले यांना पाच वर्षे थांबावे लागेल, असा टोला आमदार रोहित पवार यांनी भरत गोगावले यांना लगावला.

INd-Pak Pakistan : भारत पाकिस्तानच्या विरोधात उचलणार आणखी कडक पावले; पाकिस्तानी विमानासाठी भारत हवाई क्षेत्र बंद करणार

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार रद्द करण्यात आला. त्याचबरेाबर भारत पाकिस्तानची आणखी कोंडी करण्याच्या विचारात आहे. पाकिस्तानी विमानासाठी हवाई क्षेत्र बंद करण्याच्या विचारात भारत आहे. पूर्वेकडे जाणाऱ्या विमानांना आता चीन, श्रीलंकेला वळसा घालून जावे लागणार आहे. तसेच, व्यापारी जहाजांना बंदी करणार असल्याची माहिती आहे.

Pahalgam Terror Attack : कॅबिनेटचा महत्वाचा निर्णय

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कश्मीर एअरलिफ्टचा खर्च शासकीय तिजोरीतून

भाजप आणि शिवसेनेने श्रेय घेतलेल्या काश्मीर एअरलिफ्टचा सगळा खर्च शासकीय तिजोरीतून करण्यात आल्याचे समोर येत आहे. जवळपास 64 कोटींचा हा खर्च झाला आहे.

राज्य सरकार आणखी 1 लाख 32 हजार कोटींचे कर्ज

राज्य सरकार चालू आर्थिक वर्षात एक लाख 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढणार आहे. या कर्जासाठी शासनाने केंद्राच्या आर्थिक कामकाज विभागाकडे परवानगी मागितली आहे. 2025-26 च्या महसुली उत्पन्नाच्या उद्दिष्टानुसार तिजोरीत दरमहा सरासरी 43 हजार कोटी रुपये जमा होत नसल्याने शासनाने हे कर्ज काढण्याचे ठरविले आहे.

सुरेश कलमाडी यांना मोठा दिलासा; राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपांतून निर्दोष सुटणार!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याशी संबंधित कलमाडी यांच्या विरोधातील मनी लॉण्डरिंग प्रकरणातील ईडी तपास बंद झाला आहे. त्यासंबंधीचा ईडीचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीतील न्यायालयाने स्वीकारला आहे.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक!

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बैठकांचा धडाका लावला आहे. अशातच आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत केंद्र सरकार पाक विरोधात काही मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Mumbai Police : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या नित्वृत होणार

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता फणसळकर यांच्यानंतर पुढील पोलिस आयुक्त कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलिस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे.

Nashik Congress : नाशिकमध्ये आज काँग्रेसची सद्भावना रॅली

काँग्रेसकडून आज नाशिकमध्ये सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये दर्गा काढण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Pune Police : पुण्यातून 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त

पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 28 लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

Mumbai Fire : वांद्रे परिसरातील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुमला भीषण आग

मुंबईत काल एक मोठी आगीची घटना घडली होती. त्यानंतर आज आणखी एक आगीची घटना समोर आली आहे. वांद्रे परिसरातील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुमला आज भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आगीच्या जळून खाक झाले आहे. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

India Vs Pakistan: काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. अशातच आता पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा सीमारेषेवर गोळीबार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर या सेक्टरमध्ये हा गोळीबार झाला. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.