पहलगाम हल्ल्याने व्यथित झालेल्या गाझियाबादमधील एका मुस्लिम तरुणीने हिंदू धर्म स्वीकारला आहे. याबाबतचा व्हिडीओ हिंदू रक्षक दलाने सोशल मीडियावर शेअर केलाय. असा दावा केला जात आहे की पहलगाम हल्ल्यानं तरुणी व्यथित झाली त्यानंतर तिनं हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यात तरुणी असंही सांगते की पृथ्वीवर फक्त सनातन धर्म राहिला पाहिजे. दहशतवादाचा नायनाट केला पाहिजे.
हिंदू रक्षक दलाच्या साहिबाबाद कार्यालयात मंगळवारी होम हवन झाले. हिंदू रक्षक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी सांगितलं की, दिल्लीत राहणाऱ्या नेहा खानचा आधी तलाक झाला होता. तिच्या वडिलांनी तिला हलाला करून पुन्हा घटस्फोटीत पतीशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. पण यासाठी तिनं नकार दिला. याच दरम्यान पहलगाम हल्ला झाला. यामुळे दु:खी झालेल्या नेहानं हिंदू धर्म स्वीकारला.
पिंकी चौधरी म्हणाले की, सोशल मीडियावर तरुणीनं आमच्याशी संपर्क केला. मंगळवारी विधिवत तिने सनातन धर्म स्वीकारला. नेहा खान आता नेहा शर्मा झालीय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तिनं सनातन धर्म स्वीकारल्याचं सांगितलं.
नेहाने जय श्री राम म्हणत तिची प्रतिक्रिया दिलीय. नेहा म्हणाली की, मी माझ्या मर्जीने सनातन धर्म स्वीकारलाय. मला अधिकार आहे आणि मी सज्ञान आहे. पहलगाममध्ये जे झालं ते कुणासोबतही व्हायला नको. दहशतवाद संपवायला हवा. पृथ्वीवर फक्त सनातन धर्म रहावा. मी मुसलमान नाही तर आता सनातन आहे. पहलगाम हल्ल्याने व्यथित झाले. सगळे मुसलमान दहशतवादी असतात असं वाटलं. आमचे पूर्वजही सनातन होते आणि आता आम्ही पुन्हा घरवापसी केलीय असंही नेहाने म्हटलं.