राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची कमान माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासह या मंडळात एकूण ७ सदस्यांचा समावेश असणार आहे.
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड न्यायालयाचा दणकाआरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले च्या विरोधामध्ये शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसले ने बावी येथील ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण केली होती आणि या मारहाणीत सतीश रुपये खोक्या भोसले न्यायालयीन कोठडी मध्ये आहे त्याने जमिनीसाठी अर्ज केला होता त्याचा जमिनीचा अर्ज फेटळला.
भद्रकाली पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी बारा तासांच्या आत जेरबंद- सिने स्टाईल पद्धतीने पाठलाग करत कसारा घाटातील जंगलातून घेतले ताब्यात...
- भद्रकाली गुन्हे शोध पथकाने केली कारवाई, जिवे मारण्याच्या गुन्ह्यात असलेला संशयित गेला होता पळून
- पोलिसांच्या हाताला झटकून पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला होता समोर...
- संशयित क्रिश शिंदे याला पळून जाण्यात मदत करणाऱ्याच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश...
वर्धा विधान परिषदेचे माजी आमदार डॉ रामदास आंबटकर यांचे निधनवर्धा विधान परिषदेचे माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मा. डॉ रामदास आंबटकर यांचे दुःखद निधन झाले आहे.
दुपारी 11:55 च्या सुमारास चेन्नई येथील MGM हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
यावेळी ते 64 वर्षाचे होते. त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
आंबटकर यांनी विद्यार्थी परिषद पासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात केलीय.
लाडकीच्या खात्यात १५०० कधी येणार?राज्य सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या दिवशी एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकिंच्या अकाउंट मध्ये जमा केला जाणार अशी घोषणा झाल्यानंतर, आज अक्षय तृतीयेच्या दिनी सकाळपासून लाडक्या बहिणीच्या नजरा या जमा होणाऱ्या लाडकींच्या हप्त्यावरती लागून राहिल्या आहेत,
राज्य सरकारने अक्षय तृतीयेच्या दिवशी लाडक्या बहिणींचा हप्ता जमा करून लाडकींचे तोंड गोड करणार अशी घोषणा केली होती, परंतु सकाळपासून अद्याप पर्यंत लाडकिंच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला नसून, तो कधीपर्यंत जमा होणार याकडे आता लाडकिंचे लक्ष लागून राहिले आहे.
रामदास आंबटकर यांचं निधनमा.डॉ.रामदास आंबटकर, पूर्व विधान परिषद सदस्य, पूर्व प्रदेश सरचिटणीस व पूर्व संघटन मंत्री विदर्भ विभाग यांचे आज अल्पशा आजाराने चेन्नई येथे दुःखद निधन झाले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे पुनर्गठन; आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्तीकेंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे (National Security Advisory Board - NSAB) पुनर्गठन केले आहे. माजी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (R&AW) प्रमुख आलोक जोशी यांची या मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सात सदस्यीय या मंडळात लष्करी आणि प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पी. एम. सिन्हा, माजी दक्षिणी सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आणि रिअर ॲडमिरल मॉन्टी खन्ना हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. तसेच, राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंह हे भारतीय पोलीस सेवेतील (IPS) निवृत्त अधिकारी आहेत. याशिवाय, माजी परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी बी. वेंकटेश वर्मा यांचाही मंडळात समावेश आहे. या पुनर्गठनामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित धोरणे आणि आव्हानांवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा आहे. मंडळाचे कार्य देशाच्या सुरक्षा धोरणांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Akshaya Tritiya: अक्षय तृतीयानिमित्त यवतमाळमध्ये सोनं खरेदीसाठी गर्दीअक्षय तृतीया... हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत शुभ मानला जाणारा दिवस... आणि याच दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ व समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे यवतमाळमध्येही याच उत्साहाचं आणि श्रद्धेचं चित्र पाहायला मिळालं. शहरातील प्रमुख सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.महिलांपासून ते पुरुषांपर्यंत, सर्वच वयोगटातील नागरिक सोनं खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले.
Gold Price: मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्यात 24 हजाराची वाढअक्षय तृतीयेच्या सणानिमित्त जळगावच्या स्वर्ण बाजारात ग्राहकांनी केल सोनं खरेदी मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्यात 24 हजाराची मोठी वाढ झाली आहे आजचे सोन्याचे भाव जीएसटी सह 99 हजार 498 इतके आहे यंदाच्या अक्षय्य तृतीयामध्ये भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा मात्र बजेट कोलमडला आहे.
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावात दाखलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी दाखल.
मंदिराच्या एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त ते आज दरेगावात आले असून हा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेच ते पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत..
Pune News: पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलनशिक्षक भरती करा या मागणीसाठी आंदोलन
पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षक भरती करा या मागणीसाठी आंदोलन
सेंट्रल बिल्डिंग येथील शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षक भरती करा या मागणीसाठी आंदोलन सुरू
शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर,ठिय्या आंदोलन केलं जात आहे
पहलगामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता तेथे एनआयएचे पथक दाखलपहलगामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता, त्या ठिकाणी एनआयएचे पथक दाखल झालेय. पथकाने त्या ठिकाणी हल्ल्याचा सीन क्रिएट केलाय.
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलवावा या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमकधाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा डेपोतील दुर्गंधीयुक्त कचरा टाकत टायर जाळुन महाविकास आघाडीचे आंदोलन
कचरा डेपो इतरत्र हलवावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसापासून सुरू आहे आमरण उपोषण
धाराशिव शहरातील कचरा डेपोमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात -
कचरा डेपो इतरत्र हलवावा यासह रस्ते विकास कामांना दिलेल्या स्थगितीवरून महाविकास आघाडीकडुन आंदोलन
पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर - आंदोलकांची भेट घेवुन प्रश्न मार्गी लावणार का याकडे सर्वांचे लागले लक्ष
प्रश्न मार्गी न लावल्यास पालकमंत्र्यांना महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण करू न देण्याचा आंदोलकांचा इशारा
थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये शासनाच्या वतीने महापर्यटन उत्सवाचे आयोजन2 ते 4 मे यादरम्यान होणाऱ्या या महापर्यटन महोत्सवासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लावणार हजेरी.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने गोल्फ मैदान, वेण्णा लेक परिसरात मोठी जय्यत तयारी
तीन दिवस या उत्सवात वेण्णा लेक फेस्टिवल, हेलिकॉप्टर सफारी, साहसी खेळांचे प्रात्यक्षिक, लेजर आणि ड्रोन शो अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन
महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीने येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी
Kalyan West: कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज रोडवर अपघातएसटी बसने दुचाकीस्वाराला चिरडले
दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने एसटी बसच्या मागील चाकाखाली आल्याची प्राथमिक माहिती
बोरीवलीहून कल्याण बिर्ला कॉलेज मार्गे पुण्याच्या दिशेने जात होती एसटी बस
अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
महात्मा फुले पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला ..
विजय होताच हवेत गोळीबार; कोल्हापुरातल्या हणमंतवाडीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरलकोल्हापूरच्या हणमंतवाडीत जय बजरंग दूध संस्थेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत सत्तांतर झालंय.सत्ताधारी सरदार पिंजरे यांना धक्का देत माजी सरपंच आणि यशवंत बँकेचे माजी संचालक संग्राम भापकर यांनी सत्ता मिळवली. विजय साजरा करताना माजी सरपंच संग्राम भापकर यांनी हवेत गोळीबार केला. भापकर यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सांगलीत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हळदीला १६ हजाराचा भावसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले. यावेळी हळदीला 14 हजार 500 ते 16 हजार भाव मिळाला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात हळद बाजारपेठेमध्ये दाखल झाली होती.
पोलिसांच्या हाताला हिसका देत आरोपी पळाला, भद्रकाली पोलीस स्टेशनच्या आवारातील घटनाप्राण घातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे हा काल सायंकाळी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन फरार झाल्याची घटना घडली. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन परिसरात क्रिश शिंदे याने एकावर कोयत्याने हल्ला केला होता. भद्रकाली पोलिसांनी क्रिश शिंदे याला अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र पुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात आणताना क्रिश शिंदे यांनी पोलिसांना चकवा देत पळ काढला.
गणपतीपुळे मंदिरात हापूस आंब्याची आरासरत्नागिरीतला गणपतीपुळे मंदिरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रींच्या चरणी हापूस आंब्याची आरास करण्यात आलीय. जवळपास 800 हून अधिक आंबे हे श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आलेत. गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी ही आरास केलीय.
शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखांचा व्हिडिओ व्हायरल, बंगाली मुस्लिमांना गाव सोडण्याचा इशाराशिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक.
शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल
कल्याण ग्रामीण मधील उसाटणे आणि खोणी गावालगत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करत स्टोल्स टाकणाऱ्या बंगाली मुस्लिमांना मारहाण करत स्टोल्स तोडले.
पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या मुस्लिमांना त्वरित गाव सोडण्याचा दिला इशारा.
सरकारने यामध्ये लक्ष घालून बंगाली मसुलमानांना कोलकत्याला पाठवावे अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल ...शिवसेना शिंदे गटाचे महेश पाटील आक्रमक.
सोशल मीडियावर व्हिडिओ चांगलाच व्हायरल.
शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंचार सेनेने मुंबईतील स्विगी कार्यालयाचे शटर केले बंदशिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंचार सेनेने मुंबईतील स्विगी कार्यालयाचे शटर केले बंद. स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक.
मरोळ येथील कार्यालय शिव संचार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले बंद.
स्विगीच्या डिलिव्हरी एजन्सी पार्श्वभूमी तपासली जात नाही, ऑर्डरची फसवणूक, पैसे अडवण्याचा प्रकार, ग्राहक सेवा यंत्रणेत त्रुटी, हॉटेलची माहिती लपवणे, अरेरावीची उत्तरे असे गैरप्रकार प्रकार स्विगीकडून सुरू असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप.
आठवडाभरात यात बदल झाला नाही तर मुंबईत स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजला फिरू देणार नाही, शिवसंचारसेनेचे अध्यक्ष आणि राज्य संघटक अखिल चित्रे यांचा इशारा.
Jalgaon Temperature: जळगाव तापमान ४३ अंशांवर, १.८ अंशाने झाली वाढ पारा ४५ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यताउत्तरेला असलेला राजस्थान आणि मध्य प्रदेशकडून येणाऱ्या उष्णतेमुळे वाऱ्यांमुळे जळगावचे तापमान ४३ अंशांवर पोहोचले.
अर्थात, १.८ अंशाने तापमान वाढले.
'आयएमडी'वर ही नोंद झाली आहे. पारा ४४ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
Pune News: जिल्हा परिषदेत लाचखोरी प्रकरणानंतर 25 कर्मचाऱ्यांच्या केल्या बदल्याजिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंत्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेमध्ये सर्व टेंडर कारकुनांसह तब्बल २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
दक्षिण बांधकाम विभागामध्ये लाचखोरीमुळे तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि एका कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर निलंबित करण्यात आले. त्यानंतर लगेचच एका लेखाधिकाऱ्याची बदली
दक्षिण आणि उत्तर बांधकाम विभागातील टेंडर कारकून काही ऑडीटर्स बिलिंगची जबाबदारी असणाऱ्या कर्मचारी यांच्याबाबत तक्रारी होत्या
मार्चअखेर असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाईची प्रक्रिया थोडी लांबणीवर टाकण्यात आली़.
तब्बल २५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बजावण्यात आले.
वाढतं तापमान व उन्हापासून केळीचे पीक वाचवण्यासाठी चक्क कागदी टोपीचा सहाराविदर्भातील वाढत्या तापमानाचा फटका आता उन्हाळी पिकांना बसायला लागला आहे.
वाढतं तापमान आणि कडक ऊन यापासून नुकत्याच लागवड केलेल्या केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याने अनोखी युक्ती वापरत चक्क कागदाच्या टोप्या करून केळीचे रोप झाकले आहेत आणि कागदाच्या टोप्यांची वापरल्याचा सकारात्मक परिणामही या शेतकऱ्याला मिळाला आहे.
कठीण परिश्रम करून कागदाच्या टोप्या बनवून शेतकऱ्याने आपलं केळीचे पीक वाचवल आहे.
शेतकऱ्याची ही युक्ती बघण्यासाठी परिसरातील शेतकरी या शेतकऱ्याच्या शेतात भेट द्यायला येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव गोतमारे या गावातील विठ्ठल गोतमारे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतातील केळीच्या पिकाला ही युक्ती वापरून जीवदान दिले आहे
त्याचीही युक्ती बघून आता परिसरातील शेतकरीही कागदी टोप्यांचा सहारा तापमान व उन्हापासून आपलं पीक वापरण्यासाठी घेत असल्याच दिसून येत आहे...
Nanded: महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा समारोपमहामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह जिल्हाभरात पाहायला मिळाला.
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा समारोप करण्यात आला.
नांदेड शहरातून रॅली काढून जयंतीचा समारोप करण्यात आला.
महात्मा फुले पुतळ्यापासून ही रॅली निघाली. महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर, वजीराबाद मार्गे ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत काढण्यात आली.
या रॅलीत लेझीम पथकासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Bhandara: भंडाऱ्यात निघाला मोबाईल टॉर्च मोर्चा, पहलगाम घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदूंचा मोर्चापहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला.
याच्या निषेधार्थ भंडाऱ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोबाईल टॉर्च मोर्चा काढण्यात आला.
भंडारा शहरातील जलाराम चौकातून निघालेल्या या मोबाईल टॉर्च मोर्चात शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
यावेळी पाकिस्तान विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
Akkalkot: अक्कलकोट शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गोडाऊन पडलेअक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील गोडाऊन पडून महिलेचा मृत्यू
अंबुबाई गुज्जानुरे असं आहे मृत महिला कामगाराचे नाव
अन्नधान्य साठवण गोडाऊन पडल्याने बाजार समितीला बसला आर्थिक फटका,अन्नधान्य पडले उघड्यावर
जिल्ह्यातील ७७ लघु सिंचन प्रकल्पानी गाठला तळ, केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लकवाशिम जिल्ह्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या ७७ लघु सिंचन प्रकल्पांनी यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटीच तळ गाठला आहे.
जिल्ह्यातील ७७ प्रकल्पात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं दुष्काळाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झाला आहे.
हे प्रकल्प कोरडे पडल्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकात गुर सोडले आहेत.
Cyber Crime : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा फंडा असुरक्षित 'ॲप 'पासून राहा सावधसायबर गुन्हेगारांकडून बनावट 'ट्रॅफिक पोलिस ई-चलन'च्या नावाने
फसवणुकीचे जाळे विणण्यात आले आहे. तुमच्या मोबाईलवर व्हॉट्स ॲप फेसबुकद्वारे तुम्हाला ट्रॅफिक चलन
नावाने लिंक पाठवून त्यावर क्लिक करताच मोबाईलवर ताबा मिळवून सायबर गुन्हेगार तुमचा खासगी
डाटा आणि बँक अकाउंटवर झडप
मारुन खात्यातून रक्कम लंपास करीत
असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. लाखो वाहनधारकांची
अशा प्रकारे फसवणूक करुन सायबर गुन्हेगारांकडून कोट्यवधींची लूट
करण्यात आली असून, हे प्रकार थांबविण्यासाठी तसेच नागरिकांच्या
जागरुकतेसाठी शासनातर्फे सायबर
जागरुकता मोहीम राबविली जात आहे.
बदलापूरच्या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाला सुरुवातमागील 104 वर्षांपासून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साजऱ्या होत असलेल्या बदलापूरच्या शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची 5 दिवस यात्रा भरणारं बदलापूर हे एकमेव ठिकाण आहे.
आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून या शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली.
यावेळी ढोल ताशांच्या गजरात घोड्यावर बसलेले बाल शिवराय आणि मावळे, आदिवासींचं तारफा नृत्य अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम बांधवही या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतिक असलेला हा शिवजयंती उत्सव 5 दिवस चालणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आजपासुन दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावरराज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज पासून दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असुन सरनाईक यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तुळजापुर,धाराशिव येथील बस स्थानक इमारतीचे लोकार्पण तसेच शिक्षक पुरस्कार वितरण, वार्षिक नियोजन आढावा बैठकीसह कार्यक्रम होणार आहे तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या विकास कामांना स्थगिती दिल्याने विरोधक देखील आक्रमक झाले आहेत त्यामुळे सरनाईक यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
काश्मीरच्या पहेलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने कामशेत मध्ये रॅलीचे आयोजनमावळच्या कामशेत मध्ये सकल मराठा हिंदू समाजाच्या वतीने जमू-काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यातील नागरिकांना श्रद्धांजली सभेचे आयोजन...दरम्यान कामशेत मध्ये रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.
पंडित नेहरू विद्यालयापासून निघालेली ही रॅली आठवडी बाजार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचे सभेमध्ये रूपांतर झाले.
पहलगाव मध्ये भारतीय पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध यावेळेस करण्यात आला.
भ्याड हल्ल्या करणाऱ्या पाकिस्तान दहशतवादी कृत्य करणाऱ्याना सोडू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आली....
दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये? जालन्याच्या पर्यटकाचा मोठा दावापहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी जालन्याच्या आदर्श राऊत या पर्यटकाशी बैसरन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा दावा आदर्श राऊत यांनी केला आहे.
तू काश्मिरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का? असा प्रश्न त्या संशयिताने आदर्श राऊत यांना विचारला होता.
तर आज भीड कम है अस दहशतवादी एकमेकांशी बोलत होते असदेखील आदर्श राऊत यांचं म्हणणं आहे.हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानंतर, जालना येथील आदर्शने त्याच्याशी बोलणाऱ्या संशयिताची ओळख पटवली.
संशयित दहशतवाद्याची ओळख पटवल्यानंतर, आदर्शने एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेल संभाषण आणि मॅगी स्टॉल चालकाचा नंबर देखील पाठवला आहे.
दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये असल्याचा दावा जालन्याच्या आदर्श राऊत यांनी केला आहे
पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोरकाही विद्यार्थ्यांना केलं निलंबित
मात्र माहिती बाहेर येवू नये यासाठी महाविद्यालयाकडून खबरदारी
थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केली तक्रार त्यानंतर चक्र फिरली
ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांचं या प्रकरणावर मौन
अस्थिरोग विभागांतील विद्यार्थ्याचे रॅंगिंग झाल्याची माहिती
अक्षय तृतीयानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भव्य फुलांची आरासपुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
पहाटेपासूनच भाविकांची मोठी लाईन
बाप्पाला तब्बल अकरा हजार आंब्यांचा नैवेद्य
बाप्पाच्या मूर्तीला तब्बल 11000 आंब्याची आरस
मंदिराच्या बाहेरील परिसराला सुद्धा आकर्षक फुलांची सजावट
Pune International Airport: पुणे विमानतळाचे वेळापत्रक पुन्हा बिघडलेपुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वेळापत्रक सोमवारी मध्यरात्री नंतर पुन्हा बिघडल्याचे दिसून आले
पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा 18 ते 20 विमानांना वीस मिनिटांपासून ते अडीच तासांपर्यंत उशीर झाला
त्यामध्ये सर्वाधिक विमाने ही दिल्लीला जाणारी होती
पुणे विमानतळावर बॅगेत सिस्टीम मध्ये काही वेळ झालेला बिघाड आणि दिल्ली विमानतळावरील एक धावपट्टी बंद केल्यामुळे विमानांना उशीर झाल्याचे सांगितलं जात आहे
सोमवारी मध्यरात्री 12 पासून ते मंगळवारी पहाटे चार पर्यंत पुण्याहून दिल्ली, चेन्नई, नागपूर, जयपूर, लखनऊ, कोलकत्ता, बेंगलोर येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना झाला उशीर
School Reopen: विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा 16 जूनला सुरू होणारराज्य मंडळाच्या शाळांना येत्या दोन मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
2025 - 26 शैक्षणिक वर्षात विदर्भ वगळता इतर ठिकाणच्या शाळा 16 जून पासून सुरू होणार
विदर्भातील उष्ण तापमान लक्षात घेता तेथील शाळा 23 जून पासून सुरू होणार
शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता आणि सुसंगती राहावी या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने काही सूचना केल्या होत्या जाहीर
पुण्यातील स्वारगेट बस स्टँड आणि पुणे स्टेशनवरून महागडे मोबाईल सोडणाऱ्या आरोपीला अटकपाठलाग करत प्रवाशांचे मोबाईल सोडणाऱ्या २ आरोपींना स्वारगेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत आरोपी चोरत होते प्रवाशांचे मोबाईल फोन
तुषार अविंता लोखंडे, गणेश संजय पोळके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे
अटक केलेला आरोपींकडून १५ मोबाईल फोन पुणे पोलिसांनी केले जप्त
दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याआधी देखील अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपींनी केली आहे मोबाईलची चोरी
Pune News: पुण्यनगरीत सलोख्याचे दर्शन घडवत मंगल कलश रथयात्रेचे जल्लोषात स्वागतराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मंगल कलश यात्रा पुणे शहरात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातून येणारी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा काल पुणे शहरात दाखल झाली
रथयात्रेचे लालमहाल, कसबा पेठ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या, त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा भागांतील माती, विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार आहे
Akshaya Tritiya : अक्षय तृतीयानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदलशहराच्या मध्यभागी PMPL बस सह दुचाकी वाहनांना बंदी
अक्षय तृतीयेनिमित्त शहरातील मध्यभागी असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला होणारी भाविकांची गर्दी पाहून त्या भागातील वाहतुकीत मोठे बदल
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता, तसेच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे
बुधवारी सकाळी सात ते रात्री बारा या वेळेत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत
असे असतील वाहतुकीत बदल
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे हाॅटेल) स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे पुढे जाणे
स. गो. बर्वे चौकातून महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, काँग्रेस भवन या मार्गाने महापालिका भवन येथे जावे
दारुवाला पुलाकडून फडके हौदमार्गे जाणारी पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे