Pune : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर, तिकीट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स
Saam TV May 01, 2025 05:45 PM

Vande Bharat Sleeper: भारतीय रेल्वेकडून काही दिवसांत वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये नवी दिल्ली ते पुणे या मार्गाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. वंदे भारत ट्रेनमुळे पुणे आणि दिल्ली या दोन शहरांमधील अंतर अधिक कमी होणार आहे. या दोन शहरांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचणार आहेच,त्याशिवाय आरामदायी प्रवास करता येणार आहे.

नवी दिल्ली-पुणे मार्गावरील प्रवास अधिक आरामदायी आणि आधुनिक होईल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विभागासाठी ट्रेन मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजतेय. त्यांनी रेल्वेकडे हा प्रस्ताव पाठवलाय. ही ट्रेन पुण्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला बळकटी देईल आणि व्यावसायिक तसेच पर्यटकांसाठी उपयुक्त ठरेल.

अंतर किती कमी होणार? New Delhi to Pune Vande Bharat Sleeper: Route, Distance, Travel Time

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग अन् इतर फिचरबाबत माहिती दिली होती. वंदे भारत स्लीपर ट्रेन १५० ते १८० किमी वेगाने धावू शकते असे म्हटले जातेय. वंदे भारत स्लीपर ही ट्रेन पुणे ते दिल्ली हे १५८९ किमीचे अंतर २० तासांत पूर्ण करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

(NDLS) येथून दुपारी ४:३० वाजता सुटणारी ही ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे १:०० वाजता पुणे जंक्शनवर पोहोचेल. परतीच्या प्रवासात, पुण्याहून दुपारी ३:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता दिल्लीला पोहोचेल.

दिल्ली-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कोण कोणते थांबे असतील ? New Delhi-Pune Vande Bharat Sleeper Train: Stoppages

पुणे ते नवी दिल्ली या दोन शहरांदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. मथुरा, आग्रा कॅन्ट, ग्वाल्हेर, भोपाळ जंक्शन, खंडवा आणि भुसावळ जंक्शन येथे ट्रेन थांबेल. वंदे भारत स्लीपर ही ट्रेन १६ डब्यांची असेल. ११ एसी ३-टियर (६११ बर्थ), ४ एसी २-टियर (१८८ बर्थ) आणि १ फर्स्ट क्लास एसी (२४ बर्थ) डबे असतील.

पुणे दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकिट किती असेल ? New Delhi to Pune Vande Bharat Sleeper Ticket Price

वंदे भारत स्लीपर या ट्रेनची रचना बीईएमएल आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) तंत्रज्ञानाने केली आहे. ही ट्रेन १६० ते १८० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. पुणे ते दिल्ली प्रवासासाठी तिकीट दर अंदाजे एसी ३-टियरसाठी २५०० रुपये, एसी २-टियरसाठी ४००० रुपये आणि फर्स्ट क्लास एसीसाठी ५००० रुपये असतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.