Mumbai Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, कारने दोघांना उडवले, एकाला ट्रकनं चिरडलं
Saam TV May 01, 2025 05:45 PM

फय्याज शेख, साम टीव्ही

Mumbai-Nashik Highway: मुंबई नाशिक महामार्गावर अवघ्या १० किलोमीटरच्या अंतरावर २ भीषण अपघात घडले आहेत. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिला अपघात शहापूर तालुक्यात घडला. महामार्गावर पायी चालणाऱ्या २ व्यक्तींना एका कारने जोरदार धडक दिली. तर, दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वाराला चिरडले. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही अपघातानंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पहिला अपघात एका गावात घडला. महामार्गावर पायी चालणाऱ्या २ व्यक्तींना एका कारने जोरदार धडक दिली. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक झोपेत असल्याचा अंदाज आहे. या भीषण कार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेत एका व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले तर, गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर रूग्णलयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या अपघातानंतर अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दुसरा भीषण अपघात घडला. एका भरधाव ट्रकने एका मोटारसायकलस्वाराला चिरडले. या दुर्घटनेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नंतर ट्रक चालक फरार झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने पाठवले.

या दोन्ही घटनांमुळे शहापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून, वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. पोलीस या दोन्ही अपघातांचा तपास करीत असून, संबंधित चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.