आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात गुरुवारी 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. मु्ंबई इंडियन्सने या हंगामात सलग 5 एकूण 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईचा राजस्थान विरुद्ध सलग सहावा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधी मुंबईला मोठा झटका लागला आहे. मुंबईचा स्टार आणि युवा खेळाडू या उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे मुंबईला मोठा झटका लागला आहे.
मुंबईचा 24 वर्षीय युवा फिरकीपटू विघ्नेश पुथुर याला दुखापतीमुळे या 18 व्या हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. आयपीएलने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे प्लेऑफच्या तोंडावर मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच विघ्नेशच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेशही करण्यात आला आहे. विघ्नेशच्या जागी लेग स्पिनर रघु शर्मा याला संधी देण्यात आली आहे.
विघ्नेशने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध IPLमध्ये पदार्पण केलं. विघ्नेशने पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली. विघ्नेश या सामन्यात इमपॅक्ट प्लेअर म्हणून सहभागी झाला. विघ्नेशने या सामन्यात 3 विकेट्स घेत दिग्गज महेंद्रसिंह धोनी यालाही प्रभावित केलं होतं. धोनीने सामन्यानंतर विघ्नेशचं त्याच्या जवळ जाऊन कौतुक केलं होतं. विघ्नेशने आयपीएल 2025 मध्ये एकूण 5 सामने खेळला. विघ्नेशने या 5 सामन्यांमध्ये 18.17 च्या सरासरीने आणि 9 च्या इकॉनॉमीने एकूण 6 विकेट्स घेतल्या.
लेग स्पिनर रघु शर्मा याने पाँडेचरी आणि पंजाबचं प्रतिनिधित्व केलं आहे. रघु सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाँडेचेरीकडून खेळतो. रघुने 11 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 19.59 च्या एव्हरेजने 57 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 9 लिस्ट ए सामन्यांमध्ये 14 आणि 9 टी 20 सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत. आता रघुचा मुंबई इंडियन्स टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. रघुला 30 लाख या बेस प्राईजमध्ये मुंबईने घेतलं आहे.
पलटणला मोठा झटका, विघ्नेश पुथूर दुखापतीमुळे हंगामातून बाहेर
मुंबई इंडियन्सचा सुधारित संघ संघ : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, राज बावा, सत्यनारायण राजू, रॉबिन मिंझ, रीस टोपली, रघु शर्मा, मिचेल सँटनर, अश्वनी कुमार, मुजीब उर रहमान, अर्जुन तेंडुलकर, बेव्हन जेकब्स आणि कृष्णन श्रीजीथ.