आयपीएल 2025 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्यांच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. खरं तर प्लेऑफची शर्यत अंतिम टप्प्यात आली आहे. पण लढाई चुरशीची झाली आहे. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं आणि या शर्यतीतून एक संघ कमी झाला. चेन्नई सुपर किंग्सचा स्पर्धेतून पत्ता कट झाला आहे. पण नऊ संघापैकी एकही संघ अजून तरी प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे उर्वरित नऊ संघांपैकी कोणते चार संघ टॉप चारमध्ये राहतील. त्यातही पहिल्या दोन स्थानांवर कोणते संघ राहतील याची उत्सुकता आहे. असं असताना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या सामन्यावर राजस्थानच्या काठावरच्या आशा उरल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित काही अंशी सोपं होणार आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेतील 50वा सामना हा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईने जिंकला तर गुणातलिकेत थेट पहिलं स्थान गाठेल. तर राजस्थान रॉयल्स स्पर्धेतून आऊट होणारा दुसरा संघ ठरेल. राजस्थान रॉल्सने हा सामना जिंकला तर मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित किचकट होईल. मग उर्वरित तीन पैकी दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. तर राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफचं गणित इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. चेन्नई सुपर किंग्स वगळता अजूनही नऊ संघांना प्लेऑफची संधी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे 14 गुण आहेत आणि चार सामने शिल्लक आहेत. त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमध्ये स्थान पक्कं होईल. पंजाब किंग्सचे 13 गुण असून प्लेऑफसाठी चार पैकी दोन सामन्यात विजय मिळवावा लागेल.मुंबई इंडियन्सचं गणितही पंजाब किंग्ससारखंच आहे. गुजरात टायटन्सने 5 सामने शिल्लक आहेत. सध्या 12 गुण असून पाच पैकी दोन सामने जिंकलं की झालं. दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफसाठी 4 पैकी दोन सामने जिंकणं भाग आहे. लखनौ सुपर जायंट्सला उर्वरिती 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवावा लागेल. कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफसाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. हैदराबादचे पाच सामने शिल्लक असून पाचही सामने जिंकले तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल.