मे महिन्याला सुरूवात झाली. राज्यात हळूहळू उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. याचा सर्वाधिक फटका राज्यातील अनेक भागातील लोकांना बसत आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात सध्या उकाड्याचा कहर असून, पुणेकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत.
यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ४३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर, पुण्यातील लोहगावात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या पुणे शहरात दमट हवामान कायम राहणार आहे. काही भागांत तापमानात १ ते १.५ अंशांची घट होण्याची शक्यता असली, तरी एकूणच वातावरण उष्णच राहिल, अशी माहिती समोर आली आहे. लोहगावमध्ये सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
वेधशाळेनुसार, तीन दिवसांनी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे आणि ढगाळ राहिल, तसेच हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शहरातील इतर महत्त्वाच्या भागांतील तापमान:
३९.७ अंश
मगरपट्टा ३९.२ अंश
कोरेगाव पार्क ३८.६ अंश
हडपसर ३८.२ अंश
वडगावशेरी ३८ अंश
दरम्यान, यंदाच्या मे महिन्यात उष्णतेच्या लाटा प्रत्येक राज्यात अधिक राहण्याची शक्यता आहे. राजस्थान, हरयाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, ओडीशा, छत्तीसगड, तेलगंणा, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमध्ये उष्णेतेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर, महाराष्ट्रात उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात, १ ते ३ दिवस अधिक उष्ण लाटा अनुभवायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.