शतकानुशतके भारतीय स्वयंपाकात वापरले जाणारे देशी तूप हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
तुपामध्ये निरोगी चरबी, व्हिटॅमिन A आणि E, प्रोबायोटिक्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
तूप पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वचा आणि केसांसाठी उपयोगी ठरते.
तुपातील ब्युटिरिक अॅसिड हृदयासाठी फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात घेतल्यास सॅच्युरेटेड फॅटमुळे धोका वाढतो.
प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते. ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे, त्यांनी तूप टाळावे.
बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असेल तर तुपाचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
यकृत, मूत्रपिंड व पोटाच्या त्रासाच्या समस्यांमध्ये तूप मर्यादित घ्यावे किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये.
तुपाचे फायदे आहेतच, पण ते प्रत्येकासाठी नाही. शरीर आणि स्थितीनुसारच तूप सेवन करणे योग्य.