रामदेव बाबांवर कुणाचाच कंट्रोल नाही, ते आपल्याच जगात जगतात; 'शरबत जिहाद'वरून हायकोर्टानं सुनावलं
esakal May 01, 2025 09:45 PM

हमदर्दच्या रूह अफजाबाबत योग गुरू रामदेव बाबांनी केलेल्या टिप्पणीवरून आता कोर्टानेही फटकारलंय. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी कडक शब्दात ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटलं की, रामदेवबाबांवर कुणाचाही ताबा नाहीय. ते त्यांच्याच जगात असतात. न्यायालयाने याआधी हमदर्दच्या रूह अफजाविरोधात वादग्रस्त शरबद जिहादच्या टिप्पणी प्रकरणी रामदेव बाबांना दोषी ठरवलं होतं. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

न्यायालयाने म्हटलं की, याआधीही भविष्यात हमदर्दच्या उत्पादनांवर कोणताच व्हिडीओ जारी न करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचं उल्लंघन रामदेव बाबांनी केलंय. न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी गुरुवारी म्हटलं की, २२ एप्रिलच्या आदेशानंतरही रामदेवबाबांनी आक्षेपार्ह विधान करताना एक व्हिडीओ शेअर केलाय. आधीच्या आदेशानुसार त्यांचं प्रतिज्ञापत्र आणि आताचा नवा व्हिडीओ पाहता ते न्यायालयाचा अवमान करत असल्याचं आढळून येत आहे. न्यायालय आता त्यांना अवमान प्रकरणी नोटीस जारी करेल.

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटलं होतं की, हमदर्दच्या रूफ अफजावर शरबत जिहाद अशी टिप्पणी केलीय. ही अक्षम्य अशी चूक आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर रामदेवबाबा यांनी आश्वासन दिलं होतं की, याच्याशी संबंधित सर्व ऑनलाइन कंटेंट त्वरीत हटवला जाईल.

न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी रामदेव बाबांच्या पतंजलि फूड्स लिमिटेड विरुद्ध हमदर्द नॅशनल फाउंडेशन इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. रामदेवबाबा यांची आक्षेपार्ह टिप्पणी बचाव योग्य नाही. रामदेवबाबा यांना समज देताना कठोर कारवाईचे आदेश देऊ असा इशाराही न्यायालयाने दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.