Dividend Stocks : भागधारकांसाठी ११ रुपयांचा लाभांश जाहीर, तिमाही नफ्यात २४ टक्के वाढ
मुंबई : अन्न आणि कृषी व्यवसाय क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यावेळी कंपनीने भागधारकांसाठी लाभांशही जाहीर केला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने ७०.८ कोटी रुपांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. वार्षिक आधारावर ही २४% वाढ आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 57.1 कोटी रुपये होता.
लाभांशाची शिफारसगोदरेज अॅग्रोव्हेटच्या सचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रति शेअर ११ रुपये (११०%) अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. येत्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव अंमलात येईल.
महसूल आणि नफ्यावर दबावगोदरेज अॅग्रोव्हेटचा ऑपरेटिंग महसूल जवळजवळ २,१३४ कोटींवर स्थिर राहिला. त्याच वेळी EBITDA ०.९% ने घसरून १४६.६ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १४८ कोटी रुपये होता. EBITDA मार्जिनमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही आणि तो 6.9% वर स्थिर राहिला.
शेअर
परतावाबुधवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर गोदरेज अॅग्रोव्हेटने त्यांचे निकाल जाहीर केले. बीएसईवर कंपनीचे शेअर्स ०.५८% ने घटून ७६६ रुपयांवर बंद झाले. गोदरेज अॅग्रोव्हेटने गेल्या ६ महिन्यांत ७.०४% आणि १ वर्षात ४०.२२% परतावा दिला आहे. मात्र, या वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये आतापर्यंत गुंतवणूकदारांना फक्त २.७३% परतावा मिळाला आहे.
गोदरेज अॅग्रोव्हेटचा व्यवसायगोदरेज अॅग्रोव्हेट ही एक वैविध्यपूर्ण आणि संशोधन-आधारित कृषी-व्यवसाय कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय भारतीय शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यावर केंद्रित आहे. कंपनी पशुखाद्य, पीक संरक्षण, तेल पाम, दुग्धजन्य पदार्थ, कुक्कुटपालन आणि प्रक्रिया केलेले अन्न यासारख्या क्षेत्रांमध्ये आघाडीचे बाजारपेठेचे स्थान धारण करते.