Chandrashekhar Bawankule : पालकमंत्री बावनकुळेंच्या हस्ते आज विविध विकासकामांचे भूमिपूजन
esakal May 01, 2025 06:45 PM

काटोल : विधानसभा क्षेत्रातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जाम प्रकल्पाच्या कालवा वितरण प्रणाली सुधारणा व नुतनीकरणासह इतर विकासकामांचे भूमिपूजन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१)होणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून काटोल विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरणाऱ्या जाम प्रकल्पावरील कालव्याच्या महाराष्ट्र सुधारणा प्रकल्प अंतर्गत कालवा वितरणप्रणाली सुधारणा कामाचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता सती अनुसया माता संस्थान पारडसिंगा परिसरातील खुल्या स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच येनवा येथील महापारेषण कंपनी द्वारा २२० के. व्ही उपकेंद्र निर्मितीचा भूमिपूजन समारंभ सायंकाळी चार वाजता होणार आहे.

दरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कळमेश्वर-काटोल-वरुड २२० के.व्ही लिंक लाईनचे लोकार्पणही घुबडमेट, येनवा रोड येथे होणार असून जलसंदा मंत्री गिरीश महाजन, सुधाकर कोहळे, दिनेश ठाकरे, किशोर रेवतकर, मीनाक्षी सरोदे, समीर उमप, पुष्पा चाफले, उकेश चव्हाण, देविदास कठाणे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना शेतकरी बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.