शरद पवार वर प्रकाश महाजन: आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) पुढाकार घेत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली. पूजेनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पहलगाम हल्ला, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले होते. आता यावरून मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
प्रकाश महाजन म्हणाले की, महाराष्ट्रात फोडण्यासारखं काही नाही, म्हणून शेवटी पवार साहेबांना उपरती आली. बीड जिल्ह्यात तर पवार साहेबांनी नवरा-बायको फोडले. आम्ही तुमच्या देवाचे बाप असे भाषण करणारे पवार आहेत. मी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात न जाता बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा मारतो, असेही ते म्हणाले आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ते स्वतःला पूजा करताना देखील दाखवू शकतात, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले. शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात. हिंदू धर्माच्या दूर जाऊन राजकारण होऊ शकत नाही, हे पवारांच्या लक्षात आलं. धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे. जितेंद्र आव्हाडांना तुळजाभवानीचे मंदिर बांधावे लागले. ही हिंदूंची ताकद आहे, असेही त्यांनी म्हटले.
पहलगामचा हल्ला हा देशासाठी धक्का आहे. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. याबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, पवारांनी त्या कुटुंबाची भेट घेऊन देखील त्यांनी अतिरेक्यांनी धर्म विचारल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पवारांना अतिरेक्यांचा धर्म का लपवायचा आहे? हिंदू म्हणून मारले हे सांगायला का वाईट वाटतंय? पर्यटकांनी धर्मासाठी बलिदान दिले हे त्यांना कधीच कळणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. याबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, वडेट्टीवारांसारखे मूर्ख काँग्रेसमध्ये जमा झाले आहेत, त्यात कर्नाटकाचे मुख्यमंत्री मागे नाहीत. काँग्रेसचे नेते पाकिस्तान धार्जिणे आहेत. त्यांचे भाषणाचे क्लिप पाकिस्तान दाखवत आहे. पाकिस्तानच्या संसदेत हे लोक आपल्या सोबत असल्याचे सांगितले गेले. आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे बाळासाहेब ठाकरे होते. मात्र उद्धव ठाकरे सर्वपक्षीय सभेला देखील उपस्थित नव्हते. या सर्व लोकांचे राजकारण मुस्लिम धार्जिणे आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
https://www.youtube.com/watch?v=01e3ppi4_oi
अधिक पाहा..