बिहारमधील प्रिया राणी यांच्या शिक्षणाला गावकऱ्यांनी टोकाचा विरोध केला होता. मात्र, कुटुंबियांनी प्रसंगी गाव सोडलं आणि शहरात आपल्या मुलीला शिकवलं.
कधीकाळी विरोध करणारे लोकच आता प्रियाच्या घवघवीत यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आनंद साजरा केला आहेत.
त्यामुळे शिक्षण आणि इच्छा शक्तीची ताकद काय असते याच उत्तम उदाहरण प्रिया यांची सक्सेस स्टोरी आहे. त्या तरुणांना ध्येयाप्रती समर्पित राहण्याचा आणि कष्ट करण्याचा सल्ला देतात.
त्या सांगतात की, मुली खूप काही करू शकतात. पण त्यांना स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. मुलींना शिक्षण मिळणे खूप महत्वाचे आहे.
दररोज पहाटे उठून अभ्यास आणि NCERT पुस्तके, पेपर वाचून त्यांनी आपलं ध्येय साध्य केलं आहे. शिक्षण ही आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असल्याचं त्या सांगतात.
इंजिनिअरिंगनंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात भारतीय संरक्षण सेवेत नोकरी मिळाली तर तिसऱ्या वेळी अपयशाचा सामना केल्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्या IAS बनल्या.
69 व्या रँकने UPSC क्रॅक करत प्रिया IAS बनताच कधीकाळी त्यांच्या शिक्षणाला ज्यांनी विरोध केला तेच आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
सध्या आयएएस अधिकारी असलेल्या प्रिया राणी सोशल मीडियावर खूप फेमस असून त्यांची प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी बनला आहे.