Hania Aamir Post : पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने भारतात तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक भावनिक विनंती केली आहे. तीने म्हटले की, "कृपया दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानी लष्करावर कारवाई करा, आम्हा सामान्य कलाकारांवर नाही." या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. .
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर बंदी घातली. या निर्णयामुळे सह माहिरा खान, अली झफर यांसारख्या कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट्स भारतात बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हानिया आमिरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पंतप्रधान मोदींना उद्देशून आपली भावना व्यक्त केली.
तीने लिहिले, "जनरल असीम मुनीर यांच्या कारवायांमुळे संपूर्ण पाकिस्तानी मनोरंजन उद्योगावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. आम्ही, पाकिस्तानातील सामान्य लोक आहोत, आम्ही भारताविरुद्ध काहीही केलेले नाही. दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानी आर्मी आणि इस्लामी दहशतवादी आहेत." तीने पुढे म्हटले, "कृपया निर्दोष नागरिकांवर कारवाई करू नका."
डीपी वेगळा
या व्हायरल फोटोवर वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पण आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हा फोटो पूर्णपणे बनावट आहे. व्हायरल फोटोमधील हानियाचा डीपी तिच्या मूळ अकाउंटचा डीपी वेगळा आहे.