घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसते, तर ते म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसाही असतो. घराला सजवण्यासाठी कलात्मक वस्तूंचा वापर केल्यास ते जास्त आकर्षक, सुखद आणि व्यक्तिगत बनते. योग्य कलाकृती निवडून आपण घराला एक अनोखे आणि सुंदर रूप देऊ शकतो. आपल्याला अनेक कलाकृती भेट मिळत असतात, अनेक कलाकृती आपण बाहेर कुठल्या शहरांमध्ये पर्यटनाला गेल्यावर खरेदी करत असतो. या सगळ्या कलाकृतींचा आपण घराच्या सजावटीसाठी छान वापर करू शकतो. त्यासाठीचे काही सोपे कानमंत्र बघूया.
रंगसंगतीशी सुसंगत कलाकृतीघराच्या भिंतीच्या रंगाची जोड जुळवून कलात्मक वस्तू निवडा. उदाहरणार्थ :
पेस्टल रंगांसाठी मिनिमलिस्ट आर्ट.
गडद भिंतींवर तेजस्वी रंगांचे चित्र.
मध्यम रंगसंगतीसाठी ब्लॅक-अँड-व्हाइट फोटो किंवा स्केचेस.
एकाच भिंतीवर छोट्या-मोठ्या फ्रेम्सची मांडणी करा.
कॅनव्हास पेंटिंग, मेटल आर्ट, वुडन वर्क किंवा हस्तनिर्मित वस्तू एकत्र वापरा.
मिरर आर्ट, वॉल स्टिकर्स किंवा म्युरल्ससारख्या वेगवेगळ्या माध्यमांना प्राधान्य द्या.
कलाकृतींना योग्य प्रकाश मिळाल्यास त्यांचे सौंदर्य अधिक प्रभावीपणे दिसते.
स्पॉटलाइट्स किंवा वॉल लॅम्प्सचा वापर करून पेंटिंग्स हायलाइट करा.
नैसर्गिक प्रकाशात ठेवल्यास काही कलाकृती अधिक चमकतात.
घरातील कलाकृती केवळ खरेदी केलेल्या नसाव्यात, तर त्यात आपला सर्जनशील स्पर्शही असावा. त्यामुळे स्वतः तयार केलेल्या कलाकृती, चित्रकृती यांचा सजावटीसाठी तुम्ही छान पद्धतीने वापर करू शकता.
स्वतः काढलेली चित्रे, फोटो कॅनव्हासवर प्रिंट करून भिंतीवर लावा किंवा शोकेसमध्ये ठेवा.
प्रवासात मिळालेल्या स्मृतीच्या वस्तू (जसे की शेल्स, पोस्टर्स, हस्तकला) डिस्प्ले करा. त्यांची वेगवेगळ्या थीम्सनुसार मांडणी करा.
मुलांसोबत केलेल्या क्राफ्ट प्रोजेक्ट्सला एक आर्ट गॅलरीसारखे स्वरूप द्या.
छोट्या खोल्यांसाठी हलक्या रंगांच्या आणि मोठ्या आकाराच्या कलाकृती वापरा. (त्यामुळे जागा मोठी असल्यासारखे वाटते).
सोफ्याच्या मागे किंवा डायनिंग टेबलवर एक विशिष्ट, लक्ष वेधणारी कलाकृती ठेवा.
बेडरूममध्ये शांतता देणारी लँडस्केप पेंटिंग्ज किंवा ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट निवडा.
हिरवळ आणि नैसर्गिक घटक कलात्मकतेला जिवंत करतात.
टेरेकोटा पॉट्स, बांबू डेकोर किंवा ड्राय फ्लॉवर आर्टसारख्या नैसर्गिक वस्तू वापरा.
हँगिंग प्लांटर्समध्ये सुंदर वेली लावून भिंतीवर ग्रीन आर्ट तयार करा.
घराला विशेष रूप देण्यासाठी स्थानिक कलाकारांच्या हस्तनिर्मित वस्तू वापरा. त्यामुळे आपली सजावट युनिक बनते आणि अतिशय कमी खर्चामध्ये घराचा पूर्ण लूक बदलू शकतो.
घरात कलात्मक वस्तूंचा वापर करताना स्वतःच्या आवडीवर भर द्या. छोट्या छोट्या बदलांनीही आपल्या निवासस्थानाला एक नवीन आणि प्रेरणादायी रूप देता येते. कला ही केवळ सजावट नसते, तर ती आपल्या मनातील भावना आणि कल्पनाशक्ती व्यक्त करण्याचे एक साधन आहे. म्हणून, निर्भयपणे प्रयोग करा आणि आपल्या घराला एक कलात्मक आणि आपुलकीचे स्वरूप द्या!