Maharashtra Board HSC Result: फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षा आता संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले होते. ही परीक्षा करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने, निकालाची तारीख जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. आता निकालाची अधिकृत तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही.
कधी जाहीर होणार निकालमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या निकाल हा अंतिम टप्प्यात असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे. अंदाजानुसार, ५ ते १० मे दरम्यान हा निकाल जाहीर होऊ शकतो.
तरी विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल. या परीक्षेला 15 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे सर्वच विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बारावीचा निकाल कुठे पाहू शकता?बारावीचा निकाल हे तीन वेबसाइट्सवर पाहता येईल
निकाल कसा पाहाल?- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा (HSC) निकाल पाहण्यासाठी लिंक दिसेल.
- त्या लिंकवर क्लिक करा.
- एक नवीन पेज ओपन होईल, त्यात तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
- नंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
- तुम्हाला निकाल लगेच दिसेल. त्याचा प्रिंटआऊट काढू शकता किंवा डाउनलोड सुद्धा करू शकता.