Sara Tendulkar: सचिनची लेक सारा करतेय बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याला डेट? नाव वाचून बसेल धक्का
Saam TV May 04, 2025 06:45 PM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar)कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. खूप काळापासून सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. मात्र आता यात एक मोठी ट्विस्ट आला आहे. आता सारा तेंडुलकरचे नाव बॉलिवूडच्या एका अभिनेत्यासोबत जोडले जात आहे. हा बॉलिवूडचा अभिनेता दीपिका पदुकोणसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाला होता.

तेंडुलकर आता पुन्हा आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर आणि गहराइयांचा हिरो सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा आणि सिद्धांत एकत्र स्पॉट झाले. तेव्हापासून या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर आणि चतुर्वेदी हे चांगले मित्र आहेत. त्यांची केमिस्ट्री खूपच कमाल आहे. ते एकत्र खूपच छान दिसतात आणि आनंदी असतात. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात. भविष्यात यांचे नातं कोणते रुप घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सारा तेंडुलकर आणि ब्रॅन्डच्या कामामध्ये कायम व्यस्त असताना पाहायला मिळते. आपल्या हटके लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती कायम इन्स्टाग्रामवर शेअर करत राहते.

सिद्धांत चतुर्वेदीला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते. 'गहराइयां' त्याने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत काम केले आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. चाहते आता सिद्धांत चतुर्वेदीच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.