Babil khan cried: दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खानने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये रडत रडत बॉलीवूडमधील बनावटपणावर भाष्य करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने अनन्या पांडे, अर्जुन कपूर यांसारख्या कलाकारांचा उल्लेख करत बॉलीवूडमधील बनावटपणावर टीका केली. हा व्हिडिओ नंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवण्यात आला, परंतु तोपर्यंत तो व्हायरल झाला होता. आता त्याने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट देखील डिलिट केलं आहे.
बाबिलने या व्हिडिओत म्हटले की, "बॉलीवूडमध्ये सर्व काही बनावट आहे. अनन्या पांडे, , शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजित सिंग सारखे लोक फक्त दिखावा करतात." या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. काहींनी बाबिलच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले, तर काहींनी त्याच्या या वक्तव्यावर टीका केली.
या घटनेनंतर बाबिलने एक मोठी पोस्ट शेअर केली, यामध्ये त्याने स्पष्ट केले की, त्याचे वर्तन बनावट नाही, तर तो जसा आहे तसाच वागतो. त्याने लिहिले, "मी जसा आहे तसाच वागतो, तेच माझे खरे रूप आहे. मला बनावटपणा आवडत नाही." त्याने हेही कबूल केले की, प्रसिद्धीशी जुळवून घेणे त्याच्यासाठी कठीण आहे, परंतु तो प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो.
च्या या भावनिक उद्रेकामुळे बॉलीवूडमधील बनावटपणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे इंडस्ट्रीतील काय होते आणि प्रेक्षकांना काय दाखवले जाते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच बाबिलच्या अचानकपणे असे भावना व्यक्त करण्यामागे नेमकं कारण काय असाही प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.