वेल्हे : देशामध्ये सर्वात अवघड परीक्षा मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत शेतकऱ्याचा मुलगा शिवांश जागडे याने पहिल्याच प्रयत्नात देशात 26 वी रँक व राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवत संपादन केलेले यश हे प्रेरणादायी असून राजगड तालुक्यासह पुणे जिल्ह्याचा व राज्याचा सन्मान वाढवण्याचे काम केले असल्याचे गौरव उद्गार पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार यांनी काढले.
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये राजगड तालुक्यातील रुळे गावातील शिवांश जागडे याने परीक्षेमध्ये यश मिळवत तालुक्यातील पहिला आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवत राजगड तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला या या निमित्ताने रविवार (ता.४) रोजी तालुक्याच्या वतीने जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजन रुळे येथील मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते यावेळी पुलकुंडवार बोलत होते.
यावेळी भोरचे आमदार शंकर मांडेकर, खडकी पुणे येथील कर्नल रणजीत पाटील, सुरक्षा अधिकारी संतोष कुमार दास, राजगड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी महेश हरिचंद्रे, तहसीलदार निवास ढाणे, माजी आमदार शरद ढमाले, पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मला जागडे माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, युवा कार्यकर्ते उल्हास दारवटकर, भाजपचे सुनील जागडे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, अंकुश पासलकर, बाळासाहेब देशपांडे, सुषमा जागडे, कीर्ती देशमुख, विकास पासलकर, गणेश जागडे, दीपक जागडे, अमोल पांगारे तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पुलकुंडवार म्हणाले, 'शिवांशला शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी अद्याप वेळ असून असलेला वेळ हा ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करीत आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घालवावा.'
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची
विकासाच्या नावाखाली वसुंधरा ओरबडण्याची काम सर्वत्र सुरू
खानापूर पानशेत रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याची समस्या गंभीर
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श व प्रेरणास्थान असून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्मभूमी मध्ये माझा जन्म झालं हे मी माझी भाग्य समजतो. प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर देशाबरोबरच मी भागाची सेवा करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील.
शिवांश जागडे आयएएस अधिकारी
दुर्गम राजगड तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या तरुणांनी पाहिलेले स्वप्न हे शिवांशच्या यशामुळे साकार झाल्याची भावना निर्माण झाली असून राजगड तालुक्यासाठी शिवांश चांगल्या पद्धतीने काम करतील अशी आशा येथील नागरिकांना निर्माण झाली आहे.
अमोल नलावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य