महापालिका शाळेतील
२१२ गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेतील २१२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा राम गणेश गडकरी हॉलमध्ये उपायुक्त कपिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
महापालिकेकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम घेतले जातात. गेल्या वर्षात पहिली, दुसरी केटीएस, तिसरी ते सातवी प्रज्ञाशोध, तयारी स्पर्धा परीक्षांची व राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले आहेत. यामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
उपायुक्त जगताप यांनी विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चिती झाल्यास ते साध्य करण्यासाठी आवश्यक प्रयत्न व पुरेसा वेळ मिळतो. त्यातून ध्येयापर्यंत पोहोचता येत असल्याचे सांगितले. मार्गदर्शन करणाऱ्या १५५ शिक्षकांचाही चषक व मानपत्र देऊन सत्कार झाला. शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, संजय शिंदे, जगदीश ठोंबरे, सूर्यकांत ढाले, अजय गोसावी, सचिन पांडव, राजेंद्र आपुगडे, विक्रमसिंह भोसले, आदिती पोवारआदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी केले. प्रकाश गावडे, स्मिता पुनवतकर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक अधिकारी रसूल पाटील यांनी आभार मानले.