HSC Result 2025: यंदाही बारावीत मुलींचीच बाजी, मुलांचा अन् मुलींचा निकालात किती आहे फरक?
GH News May 05, 2025 02:07 PM

Maharashtra Board 12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंडळाने निकालाची माहिती सकाळी पत्रकार परिषदेतून केली. यंदाही निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.

बारावीच्या परीक्षेत यंदा १४ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची ८८ टक्के आहे. यंदा मंडळाच्या इतिहासात प्रथमच दहा दिवस आधी झाली. त्यामुळे यंदा निकालही लवकर लागला. कॉपी सापडल्या त्या केंद्रावरील परीक्षेशी संबंधित सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरमार्ग आढळले. ती सर्व केंद्र आता रद्द केली आहे. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने अनेक उपाय केले, असे मंडळाने पत्रकार परिषदेत सांगितले.

यंदा निकाल घसरला

यंदा बारावीचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे. सन २०२२ या वर्षात ९४.२२ टक्के निकाल लागला होता. त्यानंतर २०२३ मध्ये ९१.२५ टक्के निकाल लागला होता. २०२४ मध्ये ९३.३७ टक्के निकाल लागला आहे. तसेच या वर्षी २०२५ मध्ये ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. यंदा निकाल कमी का लागला त्यांचा आढवा घेण्यात येणार आहे.

‘टीव्ही ९ मराठी’च्या वेबसाईटवर निकाल

दुपारी 1 वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना ‘टीव्ही ९ मराठी’च्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच उद्यापासून (6 मे) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.

येथे पहा 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल…

1) https://www.tv9marathi.com

2) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

2) https://results.digilocker.gov.in

3) https://mahahsscboard.in

4) http://hscresult.mkcl.org

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.